रामेश्वर काकडे ल्ल नांदेड गतवर्षी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व गारपिटीने खरीप पिकांचे नुकसान झाल्यामुळे कापसाची उत्पादकता ६७५ किलोने तर सोयाबीनची २४७ किलोने घटली. अशी माहिती कृषी विभागाने घेतलेल्या पीककापणी प्रयोगावरुन समोर आली आहे. पिके काढणीला आल्यानंतर अवकाळी पाऊस झाला. याचा फटका पिकांना बसल्याने खरिपाची पिके हातची गेली. परिणामी शेतकर्यांना मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले. दरवर्षी कृषी विभागाच्या वतीने महसूल मंडळ स्तरावर काही गावांची निवड करुन पीककापणी प्रयोग घेण्यात येतात. यावरुन पिकांचे हेक्टरी उत्पादन वाढले की, कमी झाले हे चित्र स्पष्ट होते. कृषी कार्यालयाने २००९-१० मध्ये घेतलेल्या पीक कापणी प्रयोगावरुन कपाशीचे हेक्टरी उत्पन्न ५ क्विंटल २७ किलो एवढे निघाले, तर सोयाबीनचे ४ क्विंटल ३७ किलो आले होते. जिल्ह्यात गेल्या खरीप हंगामात कापूस व सोयाबीनचे हेक्टरी उत्पादकता वाढली होती, परंतु यावर्षी निसर्गाच्या अवकृपेने उत्पादकतेत घट झाली आहे. सोयाबीन-कापसाच्या उत्पादकतेत वाढ २०११-१२ मध्ये कपाशीच्या हेक्टरी क्षेत्रात तीन क्विंटलने वाढ होवून ८ क्विंटल ५७ किलोवर पोहोचले. तर सोयाबीनचे उत्पन्न दुपटीने वाढून १२ क्विंटल ५४ किलोवर आले. गेल्या पाच वर्षातील सरासरी उत्पादकता अशी- ज्वारी १०७३ किलो, तुर ६४८ किलो, मूग ३७२ किलो, उडीद ४२२ किलो, सोयाबीन १००० किलो, कापूस २३६ किलो, ऊस ६५ मे.टन याप्रमाणे उत्पादकता आली आहे. ज्वारीचे ८३६ तर तुरीचे ६५६ किली उत्पादन सन २०१३-१४ या वर्षात ज्वारी प्रतिहेक्टर ८३६ किलो, तूर ६५६ किलो, मूग ५२५ किलो, उडीद ५६७ किलो, सोयाबीन १२९७ किलो, कापूस २७१ किलो, ऊस प्रतिहेक्टर ६९ मे. टन याप्रमाणे उत्पादन आले. तर गेल्यावर्षी २०१२-१३ मध्ये कपाशीचे सरासरी हेक्टरी उत्पन्न ९ क्विंटल ४६ किलो तर सोयाबीनचे १५ क्विंटल ४४ किलो निघाले होते. यामुळे यंदा कापूस, सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. आगामी वर्षात खरिपाची उत्पादकता वाढण्याचा अंदाज २०१४-१५ या वर्षात जिल्ह्यातील पिकांची उत्पादकता अपेक्षित आहे. ज्वारी प्रतिहेक्टर ११८० किलो, तूर ७१३ किलो, मूग ५८०, उडीद ६२५ किलो, सोयाबीन १७०३ किलो, कापूस ३२५ किलो, ऊस ७२ मे.टन. याप्रमाणे उत्पादकता अपेक्षित आहे.
कापसाची उत्पादकता ६७५ किलोने घटली
By admin | Updated: May 17, 2014 01:05 IST