शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीने कापूस फस्त; औरंगाबादची १ लाख ८० हजार शेतकरी मदतीविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 17:43 IST

कपाशी पिकावरील बोंडअळीच्या प्रादुर्भावाने सरकारने मदतीची घोषणा केली खरी; परंतु बियाणे कंपन्यांनी सरकारच्या घोषणेविरुद्ध सूर आळवला आहे. दुसरीकडे जिल्ह्यात ८६ टक्के शेतकर्‍यांनी विमा भरलेला नसल्याने जाहीर केलेली मदत देण्यास सरकार मोठ्या अडचणीत आले आहे. त्यामुळे बळीराजाचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.

- श्रीकांत पोफळे 

औरंगाबाद : कपाशी पिकावरील बोंडअळीच्या प्रादुर्भावाने सरकारने मदतीची घोषणा केली खरी; परंतु बियाणे कंपन्यांनी सरकारच्या घोषणेविरुद्ध सूर आळवला आहे. दुसरीकडे जिल्ह्यात ८६ टक्के शेतकर्‍यांनी विमा भरलेला नसल्याने जाहीर केलेली मदत देण्यास सरकार मोठ्या अडचणीत आले आहे. त्यामुळे बळीराजाचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.                                                

हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी सरकारची कोंडी केल्याने २२ डिसेंबरला कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी मदत जाहीर केली. विमा कंपन्यांचे ८ हजार, बियाणे कंपन्यांकडून १६ हजार आणि राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निधीतून ६,८०० व १३,६०० म्हणजे कोरडवाहूसाठी हेक्टरी ३० हजार ८०० रुपये, तर बागायतीसाठी ३७ हजार ५०० रुपये अशी आर्थिक मदत देण्याची घोषणा आहे, दोन हेक्टरपर्यंत ही मदत मिळणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील १ लाख ८० हजार शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

महासुनावणीत आशा धूसरमहाराष्ट्र कापूस बी-बियाणे कायदा २००९ ‘अ ’नुसार  नुकसानभरपाई मिळावी म्हणून  जिल्ह्यातील १ लाख ८० हजार शेतकर्‍यांनी अर्ज दाखल केले आहेत. जिल्हास्तरीय तक्रार समितीने पंचनामे केल्याशिवाय नुकसानभरपाई निश्चित करता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात पंचनामे सुरूअसून महासुनावणीत निर्णय होणार आहे. त्यात चूक झाल्यास बियाणे कंपन्या किंवा शेतकरीदेखील न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.  महासुनावणीची ही प्रक्रिया सरकार रोखू शकत नाही. त्यामुळे सरकारने जाहीर केलेली मदत फक्त सरकारच्या निर्णयावर अवलंबून नाही. सध्या परिस्थितीत घोषित मदत मिळण्यास अडचणी वाढल्या आहेत.

विमा कंपन्या न्यायालयात जाणार...कृषी विभागाने जिल्ह्यात सरासरी दोन हेक्टरचे नुकसान व कापसाचा ठराविक भाव गृहीत धरून कंपन्यांनी नुकसानभरपाई देण्याचा आकडा निश्चित केला; परंतु काही छोट्या कंपन्यांची मालमत्तादेखील तेवढी नसल्याने त्या कंपन्या महासुनावणीनंतर न्यायालयात जाणार हे नक्कीच. त्यामुळे बियाणे कंपन्या हेक्टरी १६ हजारांची नुकसानभरपाई देणार नाही, या मतावर ठाम आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण कपाशी पिकाचे क्षेत्र ४ लाख ७ हजार हेक्टर असून, त्यापैकी ६५ हजार हेक्टर क्षेत्राचा विमा भरलेला आहे. म्हणजे फक्त १६ % शेतकर्‍यांनी पीकविमा भरलेला असून, उर्वरित ८४ टक्के  शेतकर्‍यांनासुद्धा विम्याचे ८ हजार मिळणार नाही. शिवाय जिल्ह्यात सरसकट हे ८ हजारसुद्धा मिळणार नाही. ज्यांनी विमा भरलेला आहे त्यांनासुद्धा सरसकट ८ हजार मिळण्यास महसूल मंडळात १०० टक्के नुकसान झाल्याचे सिद्ध झाले पाहिजे. औरंगाबादसह राज्यातील १३ लाख ६० हजार शेतकरी बोंडअळीच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. 

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद