शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीच्या खर्चाची नागपूरच्या महालेखाकारांकडून होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 13:03 IST

शहराला ४२६ कोटींचे अनुदान आतापर्यंत प्राप्त झाले असून यातील ३०० कोटी खर्च  झाले आहेत

ठळक मुद्देस्मार्ट सिटीमधून होत असलेल्या खर्चाचा हिशेब ठेवण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट नेमला आहे. नियमांच्या बाहेर आणि संचालक मंडळाच्या परवानगीशिवाय कोणतेही काम करता येत नाही.

औरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत औरंगाबाद शहराचा २०१४-१५ मध्ये समावेश करण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत राज्य आणि केंद्र शासनाकडून स्मार्ट सिटी कार्पोरेशन लि. ला ४२६ कोटी रुपये प्राप्त झाले. त्यातील तब्बल ३०० कोटी रुपये खर्चही झाले. या खर्चाचे लेखापरीक्षणच आजपर्यंत झालेले नाही. त्यामुळे नागपूरच्या महालेखाकार कार्यालयाकडून लेखा परीक्षण केले जाईल, अशी माहिती नवनियुक्त सीईओ बाबासाहेब मनोहरे यांनी दिली.

स्मार्ट सिटीमधून होत असलेल्या खर्चाचा हिशेब ठेवण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट नेमला आहे. त्याच्याकडे सर्व खर्चाच्या हिशेबाची माहिती आहे. परंतु दरवर्षी शासकीय कार्यालयांमध्ये जसे लेखा परीक्षण करण्यात येते त्या पद्धतीने स्मार्ट सिटीचे लेखापरीक्षण आजपर्यंत झालेले नाही. स्मार्ट सिटी खाजगी कंपनी असली तरी शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसारच कामाची पद्धत आहे. नियमांच्या बाहेर आणि संचालक मंडळाच्या परवानगीशिवाय कोणतेही काम करता येत नाही. मी या ठिकाणी येण्यापूर्वी नागपूरच्या महालेखाकार कार्यालयाने लेखापरीक्षण करावे अशी मागणी करण्यात आलेली आहे. आता पुन्हा मागणी करून महालेखाकार यांच्याकडून अधिकारी आणि कर्मचारी मागविण्यात येतील. त्यांच्याकडून मागील चार वर्षांमध्ये झालेल्या खर्चाचे लेखा परीक्षण करून घेतले जाईल, असे मनोहरे यांनी नमूद केले.

२५० कोटींची मनपाकडे मागणी करणारस्मार्ट सिटी योजनेत औरंगाबाद महापालिकेने २५० कोटी रुपयांचा वाटा टाकल्याशिवाय केंद्र आणि राज्य शासनाकडून उर्वरित अनुदान प्राप्त होणार नाही. महापालिकेने आर्थिक तरतूद करून स्मार्ट सिटीचा वाटा द्यावा अशी विनंती प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांना भेटून आपण करणार असल्याचे मनोहरे यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSmart Cityस्मार्ट सिटीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधी