शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : सुटकेचा निश्वास; कोविड सेंटरमधून पळालेल्या पॉझिटिव्ह कैद्याला पोलिसांनी पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 16:04 IST

बुधवारी दुपारी दिल्लीगेट परिसरात पोलिसांनी घेतले ताब्यात

औरंगाबाद : महापालिकेच्या कोविड सेंटरमधून उपचारादरम्यान पळालेल्या हर्सूल जेलमधील दोनपैकी एका कैद्याला दिल्लीगेट परिसरात बुधवारी दुपारी  सिटीचौक पोलिसांनी  पकडले. सय्यद सैफ सय्यद असद (रा. नेहरूनगर), असे अटकेतील कैद्याचे नाव आहे. 

याविषयी प्राप्त माहिती अशी की, ७ जून रोजी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास किलेअर्क येथील कोविड कें द्रातून उपचारादरम्यान कोरोना पॉझिटिव्ह कैदी अक्रम खान अय्याज खान आणि सय्यद सैफ सय्यद असद यांनी धूम ठोकली होती. या घटनेप्रकरणी बेगमपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखा आणि बेगमपुरा पोलीस त्यांचा शोध घेत होते. 

बुधवारी दुपारी कैदी सैफ हा दिल्लीगेट परिसरात पायी जात असल्याचे गस्तीवरील सिटीचौक पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे हवालदार मोरे यांना दिसले. मोरे हे सैफला ओळखत होते. यामुळे त्यांनी त्या आरोपीला जवळच्या बंद टपरीजवळ खुर्चीवर बसायला सांगितले.  सैफनेही कोणताही प्रतिकार न करता खुर्चीवर बसला. यानंतर पोलीस निरीक्षक संभाजी पवार, पोलीस कर्मचारी अभिजित देशमुख आणि माजेद हे तेथे दाखल झाले. या घटनेची माहिती कारागृह प्रशासनाला कळविण्यात आली. रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. पोलिसांच्या सांगण्याप्रमाणे  सैफ रुग्णवाहिकेत जाऊन  बसला. यानंतर त्याची रवानगी हर्सूल जेलमध्ये करण्यात आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादArrestअटकPoliceपोलिस