औरंगाबाद : जिल्हा रुग्णालयात कोरोनाबधित महिलेने मुलीला जन्म दिला. मात्र त्या बाळाला कोरोनाची लागण झाली की नाही झाली, अशी चिंता सर्वांनाच होती. अखेर या नवजात शिशुचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या कोरोनाबाधीत गर्भवतीची शनिवारी दुपारी सिझेरियनद्वारे सुखरूप प्रसुती करण्यात आली. यात बाळ, बाळंतीण दोघांची प्रकृती स्थिर असल्याचा आनंद व्यक्त जात आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल जोगेश्वरी पश्चिम (मुंबई) येथून रुग्णवाहीकेने औरंगाबाद गाठणाऱ्या कोरोनाबाधित गरोदर महिलेची अखेर शनिवारी सिजर प्रसूती झाली. या महिलेने मुलीला जन्म दिला असून, अशाप्रकारची देशातील दुसरी आणि राज्यातील पहिलीच प्रसूती आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी दुपारी १२.४० वाजता ही सिजर प्रसूती डॉक्टरांनी यशस्वी केली.