शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus news : रेड झोनमधील शाळा दुसऱ्या टप्प्यात सुरू होण्याचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 18:27 IST

मनपाच्या शाळा सॅनिटाईज करण्याच्या सूचना

औरंगाबाद : रेड झोन वगळता उर्वरित भागांतील शाळा वेळेवरच उघडण्याचे नियोजन राज्याच्या शिक्षण विभागाकडून केले जात आहे. रेड झोनमध्ये असलेल्या औरंगाबादसह इतर ठिकाणी मात्र दुसऱ्या टप्प्यांत शाळा सुरू करण्याचे संकेत शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यादृष्टीने औरंगाबाद महानगरपालिकेनेही तयारी सुरू केली आहे. 

राज्यात दरवर्षी १५ जूनपासून नवीन शैक्षिणक सत्र सुरू होते. ‘कोरोना’मुळे यंदा शाळा वेळेवर सुरू होतील की नाही,  याबाबत  पालकांमध्ये संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाच्या सचिव वंदना कृष्णा यांनी राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यात औरंगाबाद महापालिकेच्या शिक्षण विभागाचे अधिकारीही सहभागी झाले होते. या बैठकीत शाळा सुरू करण्याच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यात पहिल्या टप्प्यात ग्रीन झोनमधील शाळा सुरू होतील, असे सांगण्यात आले. 

शाळा सुरू करताना वर्गातील विद्यार्थी संख्या कमी ठेवण्याच्या अनुषंगाने काही पर्यांयांचा विचार झाला. त्यात काही विद्यार्थी आज, तर काही विद्यार्थी दुसऱ्या दिवशी, अशा रोटेशन पद्धतीने शाळा भरविणे किंवा वीस-वीस विद्यार्थ्यांच्या तुकड्या करून एका बाकावर एकच विद्यार्थी बसविणे, असे पर्याय सुचविण्यात आले. रेड झोनमधील शाळा दुसऱ्या टप्प्यात सुरू करण्याचा विचार शासन स्तरावर सुरू आहे. त्या अनुषंगाने तूर्तास शाळा सॅनिटाईज करून घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

यंदाही मोफत पुस्तकांचे वाटपराज्यात सरकारी आणि अनुदानित खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके पुरविली जातात. यंदाही हे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार ग्रीन झोनमधील शाळांना आधी पुस्तके पुरविण्यात येणार आहेत. मंगळवारपासून डेपोतून जिल्हास्तरावर, नंतर केंद्रस्तरावर आणि तेथून पुढे शाळांना ही पुस्तके पुरविली जाणार असल्याचे मनपाच्या सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादEducationशिक्षणSchoolशाळा