शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

CoronaVirus News : औरंगाबादेत कोरोना रुग्णाचा मृतदेह चार दिवसांपासून पडून, नातेवाइकांचा शोध लागेना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 12:35 AM

CoronaVirus News : विजय पांडुरंग मोरे (५२, रा. ढाकेफळ, ता. पैठण) असे मृत रुग्णाचे नाव आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे ८ एप्रिल रोजी ते घाटीत भरती झाले होते.

औरंगाबाद : कोरोनामुळे जवळचे लोकही दूर जात आहेत. रुग्णाकडे पाठ फिरवित आहेत. याचीच प्रचिती घाटीत आली आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या एका रुग्णाचा मृतदेह ४ दिवसांपासून शवागृहातच पडून आहे. कारण अंत्यसंस्कार आणि त्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नातेवाईकांचा शोध लागत नाही. मृत्यूनंतरही सुटका होत नसल्याची मन हेलावणारी परिस्थिती पाहायला मिळत आहे.विजय पांडुरंग मोरे (५२, रा. ढाकेफळ, ता. पैठण) असे मृत रुग्णाचे नाव आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे ८ एप्रिल रोजी ते घाटीत भरती झाले होते. उपचार सुरू असताना १३ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर घाटीतील समाजसेवा अधीक्षकांनी रुग्ण दाखल होताना दिलेल्या दोन्ही मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला; परंतु एक मोबाईल नंबर बंद होता तर दुसऱ्या नंबरवर संपर्क झाला. मात्र नातेवाईक असल्यासंदर्भात स्पष्टता झाली नाही. त्यामुळे १३ एप्रिलपासून विजय मोरे यांचा मृतदेह घाटीतील शवागृहातच आहे. नातेवाईकांशिवाय अंत्यविधी करण्यासाठी पोलिसांनी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे; परंतु हद्दीच्या प्रश्नात ही प्रक्रियाही अडकली आहे. उपचारासाठी नोंदविण्यात आलेले नाव बरोबर आहे की नाही, यावरही शंका उपस्थित होत आहे.

पोलिसांना माहिती कळविलीढाकेफळ येथून रुग्ण रेफर झाला होता. दिलेल्या पत्त्यानुसार गावात विचारणा करण्यात आली; परंतु पोलीस पाटील यांनी असे कोणी नाही, असे सांगितले. दिलेल्या दोन मोबाईल नंबरपैकी एक बंद आहे, तर दुसरा राँग नंबर असल्याचे सांगितले जाते. यासंदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.- डाॅ. सुरेश हरबडे, वैद्यकीय अधीक्षक, घाटी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस