शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

CoronaVirus : कोविडमध्ये आंदोलन ; कराड, बागडे, सावेसह भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 14:52 IST

CoronaVirus : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर तेथे हिंसाचार उसळला आहे. या हिंसाचाराच्या निषेधार्थ शहर भाजपतर्फे बुधवारी (दि.५) सकाळी उस्मानपुरा येथील पक्ष कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देशहरात कोविड संसर्ग वाढत असून त्याला रोखण्यासाठी संचारबंदी व जमावबंदी लागू असल्यामुळे कोणत्याही आंदोलनाला परवानगी नाही.

औरंगाबाद: विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालात उसळलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ शहरात विनापरवानगी आंदोलन करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांविरुध्द वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुरूवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. कोविड संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन, कोरोना संसर्गाचा प्रसार आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे आदी कलमांनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपचे शहराध्यक्ष संजय केनेकर, खा. डाॅ. भागवत कराड, आ. हरीभाऊ बागडे, आ. अतुल सावे, महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर, बापू घडामोडे, प्रमोद राठोड, भावराव देशमुख, राजेश मेहता, शेख हबीब, धनंजय पालोदकर, सविता कुलकर्णी या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर तेथे हिंसाचार उसळला आहे. पश्चिम बंगालात सत्तेवर आलेल्या टीएमसी पक्षाने हा हिंसाचार घडविला असून त्यात भाजपाचे समर्थक व पदाधिकारी बळी पडले आहेत, असा आरोप भाजपाने केला आहे. या हिंसाचाराच्या निषेधार्थ शहर भाजपतर्फे बुधवारी (दि.५) सकाळी उस्मानपुरा येथील पक्ष कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. शहरात कोविड संसर्ग वाढत असून त्याला रोखण्यासाठी संचारबंदी व जमावबंदी लागू असल्यामुळे कोणत्याही आंदोलनाला परवानगी नाही. असे असताना भाजपने हे आंदोलन केले. हवालदार मोतीलाल गायकवाड यांनी वेदांतनगर ठाण्यात सरकारतर्फे तक्रार देऊन गुन्हा नोंदविला. पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार राहुल भदरगे हे तपास करीत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादBJPभाजपा