शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : ‘कोरोना’ संकटाने दाखवून दिला प्रदूषणमुक्तीचा मार्ग;जगभरातील प्रदूषण ५० टक्क्यांनी झाले कमी

By गजानन दिवाण | Updated: April 14, 2020 16:36 IST

चीन, इटली, इंग्लंड, जर्मनी आदी देशांमधील कार्बन डाय आॅक्साईड आणि नायट्रोजन आॅक्साईडचे प्रमाण ४० टक्क्यांनी घटले.

ठळक मुद्देप्रदूषणावर गंभीर विचार करण्याची हीच वेळअमेरिकेत कार्बन उर्त्सजन ४० टक्क्यांनी, तर चीनमध्ये २५ टक्क्यांनी कमी झाले.

- गजानन दिवाणऔरंगाबाद : ‘कोरोना’च्या संकटाने जगभराचा ताप वाढविला असतानाच प्रदूषण कसे रोखता येऊ शकते, याचा मार्गही दाखवून दिला आहे. संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे गेल्या महिनाभरात जगभरातील प्रमुख शहरांमधील प्रदूषण साधारण ५० टक्क्यांनी कमी झाले आहे.

पर्यावरण तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण गेल्या २० वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचले आहे. न्यूयॉर्कमध्ये वाहनांची वर्दळ गेल्या वर्षीच्या तुलनेत ६५ टक्क्यांनी कमी नोंदविली गेली आहे. यामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी झाले. मार्चमधील वातावरण माझ्या आयुष्यात पाहिलेले सर्वात स्वच्छ वातावरण असल्याचे कोलंबिया युनिव्हर्सिटीचे प्रा. रोईसेन कॉमेन यांनी म्हटले आहे.चीनमध्ये वीज वापरात तब्बल २५ टक्क्यांची घट झाली आहे. चीन आणि इटलीमध्ये नायट्रोजन डाय आॅक्साईडच्या प्रमाणातही लक्षणीय घट नोंदविली गेली आहे. प्रदूषण निर्मितीत आणि पृथ्वीवरील तापमान वाढविण्यात या वायूचा मोठा वाटा आहे. हवामानात प्रचंड विष सोडणारी शहरे म्हणून ओळख असलेल्या बँकॉक, बीजिंग, बोगोटा आदी ठिकाणचे वातावरण सध्या एकदम स्वच्छ आहे. थायलंडची राजधानी असलेल्या बँकॉकमध्ये गेल्या महिन्यात प्रदूषणामुळे शाळा बंद ठेवाव्या लागल्या होत्या. लॉकडाऊनमुळे आता येथील वातावरण एकदम स्वच्छ आहे.

ब्राझीलमधील प्रसिद्ध शहर साओ पाऊलोच्या रस्त्यावर दिवसा हजारो मोटारी दिसायच्या. ट्रॅफिक जाम कायम असायचे. तेवढेच प्रदूषणही व्हायचे. सव्वाकोटी लोकसंख्येचे हे शहर आता लॉकडाऊनमुळे अगदीच छोटे शहर भासत आहे.कोलंबियाची राजधानी असलेल्या बोगोटामध्ये प्रदूषणाचा प्रश्न इतका भयंकर होता की तिथे अधिकारी अधूनमधून गाड्यांवर बंदी घालत असत. ‘सध्याची स्थिती वातावरणातील हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करीत आहे,’ ही बोगोटाच्या जिल्हा पर्यावरण सचिव कॅरोलिना यांची प्रतिक्रिया प्रदूषणाची बदलती स्थिती सांगून जाते. नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीच्या सॅटेलाईट छायाचित्रांनीदेखील प्रदुषणाचा हा बदल टिपला आहे. ‘कोरोना’च्या संकटातून चीन आता काहीसा सावरत असल्याने प्रदूषण पुन्हा वाढताना दिसत आहे. मात्र, जानेवारीअखेरनंतर चीनमध्ये कोरोनाचे संकट भयावह स्थितीत असताना तेथील प्रदूषण तब्बल २५ टक्क्यांनी कमी झाले होते. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून नायट्रोजन आॅक्साईडचे प्रमाण पुन्हा वाढू लागले आहे.प्रदूषणावर गंभीर विचार करण्याची हीच वेळप्रदूषणामध्ये वाहनांचा वाटा किती मोठा, हे ‘कोरोना’च्या संकटाने जगभराला दाखवून दिले आहे. कोरोनाचे संकट मोठे आहेच; पण याच संकटाने आपल्याला ताजी हवा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे प्रदूषणावर शांतपणे आणि तेवढेच गंभीरपणे विचार करण्याची हीच वेळ असल्याचे ‘सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट अ‍ॅण्ड सायन्सच्या संचालक सुनीता नारायण यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याpollutionप्रदूषणenvironmentपर्यावरण