शहरं
Join us  
Trending Stories
1
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
2
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
3
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
4
KKRचा संघ QUALIFIER 1 साठी पात्र, GT चे आव्हानं संपल्यात जमा! अहमदाबादहून Live Updates 
5
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
6
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
7
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
8
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
9
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
10
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
11
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
13
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
14
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
15
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
16
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
17
हार्दिक पांड्याला उप कर्णधारपद BCCI अधिकाऱ्याच्या दबावामुळे मिळालं?
18
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
19
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
20
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी

Coronavirus : औरंगाबादकरांना मोठा धक्का ! तब्बल ६१ पॉझिटिव्हसह रुग्णसंख्या सहाशे पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 12:57 PM

जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या ६१९ झाली आहे

ठळक मुद्देशहरात कोरोनाचा १४ वा बळीदोन दिवसात १११ रुग्णांची भर

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात ५० रुग्ण वाढल्यावर सोमवारी सकाळीच तब्बल ६१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ६१९ झाली आहे अशी माहिती अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांनी दिली.

रामनगर 22, एस आरपीएफ जवान १, सदानंदनगर 8, किलेअर्क ८, न्यायनगर २, दत्त नगर कैलास नगर ५ , भवानी नगर जुना मोंढा 3, पुंडलिक नगर गल्ली 1 , एन 4 सिडको, बायजीपुरा,  संजयनगर, कैलासनगर, बीड बायपास, कोतवालपुरा, सातारा गाव  येथील प्रत्येकी एक फुलशिवरा गंगापूर येथील 4 रुग्णांचा समावेश असल्याचे माध्यम समन्वयक डॉ अरविंद गायकवाड यांनी सांगितले

चार दिवसात २४१ रुग्णांची भरशहरात रविवारी सकाळच्या सत्रात सात भागातील ३७ रुग्ण आढळल्यावर दुपारच्या सत्रात १३ रुग्णांची भर पडत दिवसभरात रुग्णसंख्या ५० तर एकुण बाधितांची संख्या ५५८ झाली होती. मागील चार दिवसात शहरात शुक्रवारी १०० , शनिवारी ३० आणि रविवारी ५० , सोमवारी सकाळी ६१ अशा तब्बल २४१ रुग्णांची भर पडल्याने शहरवासीयांना मोठा धक्का बसला आहे.

शहरात कोरोनाचा १४ वा बळीऔरंगाबादेत कोरोनाचा १४ वा बळी गेला. घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना रामनगर- मुकुंदवाडी येथील ८० वर्षीय रुग्णाचा रात्री १.१० वाजेच्या सुमारास मृत्यू झाला, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. सदर रुग्णावर घाटीत ८ मे पासून उपचार सुरू होते. ९ मे रोजी या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने १० मे पासून ते व्हेंटिलेटरवर होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शहरातील हा कोरोनाचा १४ मृत्यु आहे.

कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९२ वरऔरंगाबादमध्ये शनिवारी एकाच दिवशी ३५ जण कोरोनामुक्त झाले होते. सलग दुसऱ्या दिवशी रविवारी आणखी २७ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला. यातील आठ रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.  तर मनपाच्या केंद्रात दाखल १९ जणही कोरोनामुक्त झाले. यामुळे एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९२ वर गेली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद