शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये कोरोनाचा मृत्यूदर २.५२ वरून ४.६३ वर; १५ दिवसांपासून रोज मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 19:41 IST

यादरम्यान २५ मे रोजी सर्वाधिक म्हणजे ६ रुग्णांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्दे रोज मृत्यू पावणाऱ्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे. ५१ ते ८० वयोगटातील सर्वाधिक मृत्यू

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : शहरात गेल्या १५ दिवसांपासून कोरोनामुळे शहरात रोज रुग्णांचा मृत्यू होत आहे. या १५ दिवसांत तब्बल ४६ जणांचा कोरोनामुळे बळी गेला. धक्कादायक म्हणजे या कालावधीत मृत्यूदर २.५२ वरून ४.६३ टक्के झाला. परिणामीे, चिंता व्यक्त होत आहे.

शहरात आतापर्यंत मृत्यू पावलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ६३ झाली आहे. शहरात ५ एप्रिल ते १२ मेदरम्यान कोरोनामुळे एकूण १७ जणांचा मृत्यू झालेला होता. या तारखेपर्यंत शहरात मृत्यूदर २.५२ टक्के होता. मात्र, १३ मेपासूनचा प्रत्येक दिवस शहराची चिंता वाढविणारा ठरत आहे. कारण या दिवसापासून शहरात रोज कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे दिसत आहे.  यादरम्यान २५ मे रोजी सर्वाधिक म्हणजे ६ रुग्णांचा मृत्यू झाला. रोज मृत्यू पावणाऱ्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे. 

५१ ते ८० वयोगटातील सर्वाधिक मृत्यूशहरात आतापर्यंत ३२ ते ९४ या वयोगटातील रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. यात एकूण ६३ मृत्यंूपैकी  ५१ ते ८० या वयोगटातील सर्वाधिक म्हणजे ४९ मृत्यू झालेले आहेत. बहुतांश रुग्णांना मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब आदी गंभीर आजार होते. या आजारांमुळे रुग्णांनी उपचारास प्रतिसाद दिला नसल्याने मृत्यू ओढवल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मृत्यू रोखण्याचे आव्हानशहरात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या वाढल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. अतिगंभीर रुग्णांना फायदेशीर ठरणारे ३५ हजारांचे इंजेक्शन देण्यासह अनेक उपाय केले जात आहेत; परंतु मृत्यूचे सत्र थांबविण्यात अपयश येत आहे. आरोग्य यंत्रणेसमोर कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्याचे आव्हान उभे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू