coronavirus : औरंगाबादेत ४५ बाधितांची वाढ; रुग्णसंख्या २०६५ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 08:50 AM2020-06-08T08:50:21+5:302020-06-08T08:50:51+5:30
सध्या ७३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत
औरंगाबाद : जिल्ह्यात ४५ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या २०६५ झाली आहे. यापैकी १२२२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून १०४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. तर ७३९ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने सोमवारी (दि ८) सांगितले.
आढळलेल्या रुग्णांत शिवशंकर कॉलनी १, बौद्ध नगर १, पीर बाजार, उस्मानपुरा ८, पोलिस क्वार्टर, तिसगाव १, भोईवाडा, मिलकॉर्नर १, सातारा परिसर ३, पद्मपुरा १, फाजीलपुरा, मोहनलाल नगर १, सिडको एन-नऊ, रेणुका माता मंदिर १, न्यू हनुमान नगर, गारखेडा १, मजनू हिल, दमडी मोहल्ला १, ज्युबली पार्क १, गारखेडा परिसर १, चिकलठाणा २, बौद्ध नगर, जवाहर कॉलनी १, एन-नऊ, संत ज्ञानेश्वर नगर ५, सादाफ कॉलनी, कटकट गेट २, पुंडलिक नगर १, विद्या निकेतन कॉलनी २, भोईवाडा १, शिवाजी नगर, गारखेडा १, सेंट्रल नाका, बायजीपुरा १,एन-चार, सिडको १, कैलास नगर १, गणेश नगर, पंढरपूर परिसर १, अन्य २, देवशी पिंपळगाव, गंगापूर १, सावरखेडा, सोयगाव १ या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये १८ महिला आणि २७ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.