औरंगाबाद : शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. बायजीपुऱ्यातील १५ वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर असल्याची माहिती डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता २९ वर गेली आहे.
शहरात मंगळवारी सायंकाळी बायजीपुऱ्यातील १७ वर्षीय मुलाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. सदर मुलगा १० एप्रिल रोजीच खाजगी रुग्णवाहिकेने मुंबईहून आई-वडिलांसह शहरात दाखल झाला होता. त्याची आई गरोदर असल्याने प्रसूतीसाठी ते औरंगाबादेत आले. मुंबईहुन आल्याने मनपाने तिघांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले होते. यात मुलाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला, तर त्याच्या वडिलांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्याच्या आईचाही स्वब घेण्यात आलेला होता. हा अहवाल काय येतो, याकडे दोन दिवसांपासून लक्ष लागले होते. अखेर हा अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली. आता १५ वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.