शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

coronavirus : दुसऱ्या लाटेत एचआरसीटीचा बोलबाला; १५ कोटींची उलाढाल, जवळपास ५० टक्के रुग्णांचे सीटी स्कॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 12:36 IST

गेल्यावर्षीच्या तुलनेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एचआरसीटीचा बोलबाला सुरू असल्याचे दिसते आहे.

ठळक मुद्देएका स्कॅनसाठी १६, ३२, ६४ स्लाइडच्या तुलनेत दर आकारला जातोखासगी हॉस्पिटलमध्ये एक्स-रे काढण्याचा मुद्दाच दुसऱ्या लाटेत कालबाह्य

- विकास राऊत

औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हायरिसोलेशन कॉम्प्युटेड टोमोग्राफीला (एचआरसीटी ) विशेष महत्त्व दिले जात असून, यातून मागील तीन महिन्यात शहरात तब्बल १५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

गेल्यावर्षीच्या तुलनेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एचआरसीटीचा बोलबाला सुरू असल्याचे दिसते आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेनेदेखील सीटी स्कॅनपासून सावधान राहण्याचा इशारा दिला आहे. असे असताना एचआरसीटीच्या स्कोअरवरून माइल्ड, मॉड्युलर, सिव्हिअर असे रुग्णांचे विश्लेषण केले जात असून, या एचआरसीटीसाठी मागील तीन महिन्यांत शहरात ८० हजारांपैकी अंदाजे ४० हजार रुग्णांचे जवळपास १५ कोटी रुपये खर्च झाल्याचे दिसते आहे.

एका स्कॅनसाठी १६, ३२, ६४ स्लाइडच्या तुलनेत दर आकारला जातो, परंतु शासनाने १६ स्लाइडच्या स्कॅनिंगसाठी २५०० रुपये दर ठरवून दिला आहे. एप्रिलमध्ये ४४ हजार, तर मार्च आणि फेब्रुवारीत सुमारे ३६ हजार रुग्ण कोरोनाच्या विळख्यात सापडले. ८० हजार रुग्णांपैकी ४० हजार रुग्णांनी घाटी, मेल्ट्रॉन, मिनी घाटी, कोविड केअर सेंटर आणि होम आयसोलेशनमार्फत उपचार घेतल्याच्या अंदाजानुसार उर्वरित ४० हजार रुग्णांनी खासगी व धर्मादाय हॉस्पिटल्समध्ये उपचार घेतले. त्या रुग्णांवार एचआरसीटीच्या आधारेच उपचार करण्यात आले.

कोरोनाच्या अनुषंगाने ४५०० बेड्स क्षमतेपैकी १२५० शासकीय हॉस्पिटलमधील बेड्सची संख्या आहे. शासकीय हॉस्पिटल्समध्ये गरज असेल तरच एचआरसीटी केले जात आहे. तीन महिन्यांत सात ते आठ हजार रुग्णांचे एचआरसीटी शासकीय हॉस्पिटल्समध्ये करण्यात आले. काही रुग्णांचे डिजिटल एक्स-रेवर कोरोनाचे निदान केले. मात्र खासगी हॉस्पिटलमध्ये एक्स-रे काढण्याचा मुद्दाच दुसऱ्या लाटेत कालबाह्य ठरतो आहे.

औरंगाबादमधील हॉस्पिटल्सवर एक नजरएकूण हॉस्पिटल्स - ६५०, शहरातील हॉस्पिटल- ४००, मोठे हॉस्पिटल- ८०, धर्मदाय हॉस्पिटल- १५, कोविड हॉस्पिटल- ११५

टेस्ट निगेटिव्ह आली तर अनेकांची एचआरसीटीकोरोनाची आरटीपीसीआर, अ‍ॅण्टिजन टेस्ट निगेटिव्ह आली तरी एचआरसीटी करण्याचा सल्ला अनेकांना दिला जात आहे, तर पालिकेने निर्धारित केलेल्या टेस्ट सेंटरवरून पॉझिटिव्ह टेस्ट आली की, थेट एचआरसीटी करून घेण्यास सांगण्यात येते.

शहरात १० सीटी स्कॅन केंद्र आहेतशहरात १० रेडिओलॉजी सेंटर्स असून, खासगी हॉस्पिटलमध्ये स्वत: सेंटर आहे. मोठ्या धर्मदाय हॉस्पिटलसह कोविड हॉस्पिटल्समध्येदेखील एचआरसीटी करणाऱ्या स्कॅनिंग मशीनची सुविधा आहे. त्यामुळे खासगी हॉस्पिटल्समध्ये टेस्ट करण्यापूर्वीच नागरिक लक्षणांच्या अनुषंगाने तपासणीसाठी गेले की एचआरसीटी करण्यास सांगण्यात येत आहे.

एचआरसीटी प्रत्येकाची करण्याची गरज नाहीमागील तीन महिन्यांत ८० हजारांच्या आसपास रुग्ण कोरोना आढळले. त्यातील ५० टक्के रुग्णांची एचआरसीटी स्कॅन केलेच असतील. गेले वर्ष एक्स-रे वर कोरोनाचे निदान करून उपचार केले. परंतु दुसऱ्या लाटेत एचआरसीटीला इतके महत्त्व का दिले जात आहे, हे कळण्यास मार्ग नाही. एचआरसीटी प्रत्येक रुग्णांसाठी गरजेचे नाही. शासनाने नेमून दिलेल्या रकमेपेक्षा जास्तीची रक्कमदेखील यासाठी घेतली जात आहे. निश्चितपणे शहरात यातून १२ ते १५ कोटींची उलाढाल झालीच असेल.- डॉ. सुंदरराव कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद