शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

यंदा बंधाऱ्यांच्या गेट खरेदीला ‘कोरोना’चे कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 19:59 IST

अजूनही जिल्ह्यातील १०५ कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे गेटविना 

ठळक मुद्देकोट्यवधी रुपयांचा चुराडा दुरुस्तीसाठीही निधीची अडचण

- विजय सरवदे

औरंगाबाद : दरवर्षी पाऊस सुरू झाला की, कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या गेटचा विषय चर्चेला येतो. पावसाळ्याचे चार महिने सरल्यानंतर हा विषय पुन्हा अडगळीत पडतो. अलीकडे गेट खरेदीसाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले, तरी अजूनही गेटविना १०५ बंधारे सताड उघडेच आहेत. त्यामुळे यंदा या बंधाऱ्यांत टिपूसभरही पाणी अडणार नाही. दुसरीकडे, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या सर्व निधीमध्ये कपात करण्यात आल्यामुळे यंदाही गेट खरेदी करणे प्रशासनाला शक्य होणार नाही. 

जिल्ह्यामध्ये ५८५ कोल्हापुरी बंधारे असून, मागील अनेक वर्षांपासून १५० बंधाऱ्यांना गेटच नव्हते. गेट खरेदीसाठी दोन वर्षांपूर्वी जि.प. उपकरातून पावणेदोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते; परंतु राजकीय हित आणि वेळोवेळी ठराव बदलण्यात आल्यामुळे निविदा प्रक्रियेला विलंब होत गेला. गेल्या अनेक वर्षापासून गेट खरेदीचा जिल्हा परिषदेमध्ये घोळ चालू असल्याचे चित्र आहे. 

गेल्या वर्षी तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांनी पुढाकार घेऊन ६२ बंधाऱ्यांना १७७७ गेट खरेदी करण्याची प्रक्रिया मार्गी लावली. त्यापैकी प्रत्यक्ष १३९८ गेट बसविण्यात आले असून, उर्वरित ३७९ गेट खरेदीसाठी कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. जलयुक्त शिवार योजनेतूनही २२०० गेट बसविण्यात आले आहेत. यावर्षी (सन २०२०-२१) ६५ लाखांचे ६०० दरवाजे खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. १८ बंधाऱ्यांना हे दरवाजे बसविण्यात येणार आहेत. तरीही आणखी १०५ बंधाऱ्यांना गेटची गरज आहे. त्यासाठी ३,१०५ खरेदी करण्याकरिता ३ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. मात्र, यंदा गेट खरेदीला ‘कोरोना’चा अडसर ठरला आहे. शासनाने सर्व योजना व खरेदीवर निर्बंध घातले आहेत. गेट खरेदी न झाल्यास यंदाही अनेक बंधाऱ्यांमधील पाणी वाहून जाणार आहे. 

दुरुस्तीसाठीही निधीची अडचणगेल्या वर्षी आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ५८ बंधारे वाहून गेले, तर यंदा ४ बंधाऱ्यांना क्षती पोहोचली आहे. या एकूण ६२ बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ८ कोटी ४५ लाख ३२ हजार रुपयांचा निधी लागणार आहे. मात्र, यंदा ‘कोरोना’मुळे ‘डीपीसी’कडून निधी मिळणे शक्य नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

४८७ को.प. बंधाऱ्यांमध्ये यंदा पाणीसाठा होऊ शकेलगेल्या वर्षी जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांवर जलयुक्त शिवार आणि उपकरातून ३ हजार ५९८ गेट बसविण्यात आले आहेत. त्यामुळे चालू वर्षामध्ये साधारणपणे ४८७ बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा होऊ शकेल. तसे झाल्यास भूगर्भातील पाणीपातळीत वाढ होऊन सुमारे ६००० हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकेल. - एस. जी. राठोड, प्रभारी कार्यकारी अभियंता, सिंचन विभाग, जिल्हा परिषद 

टॅग्स :WaterपाणीAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदfundsनिधी