शहरं
Join us  
Trending Stories
1
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
2
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
3
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
5
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
6
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
7
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
8
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
9
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
10
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
11
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
12
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
13
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
14
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
15
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
16
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
17
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
18
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
19
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
20
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?

corona virus : औरंगाबादमधील कोरोना संशयिताच्या प्रकृतीत सुधारणा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:07 IST

रुग्णावर ‘सीव्हीटीएस’च्या इमारतीत अतिदक्षतेत उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देसदर रुग्ण ऑक्सिजनवर आहे.अनेकांनी भीतीपोटी घाटीत येण्याचे टाळले

औरंगाबाद : कोरोनाच्या संशयावरून रुग्णाला तातडीने डॉक्टरांच्या पथकासह रुग्णवाहिकेद्वारे चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणी तपासणी केल्यानंतर त्याला अधिक उपचारासाठी पुन्हा घाटीत हलविण्यात आले. त्याच्यावर ‘सीव्हीटीएस’च्या इमारतीत अतिदक्षतेत उपचार सुरू आहेत. सदर रुग्ण आॅक्सिजनवर आहे.

सध्या त्याला व्हेंटिलेटरची आवश्यकता नसून, त्याची प्रकृती स्थिर आहे. दाखल झाल्यापासून त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही, असे घाटीतील डॉक्टरांनी सांगितले. कोरोना तपासणीसाठी घेतलेल्या स्वॅबचा ४८ तास ते ३ दिवसांत अहवाल प्राप्त होतो, असेही तज्ज्ञांनी सांगितले.घाटीत कोरोना संशयित रुग्ण दाखल झाल्याची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली आहे. परिणामी, घाटीतील रुग्ण, नातेवाईकांची संख्या रोडावली आहे. बाह्यरुग्ण विभागात दररोज २ ते २,५०० रुग्ण येतात; परंतु अनेकांनी भीतीपोटी गुरुवारी घाटीत येण्याचे टाळल्याचे दिसून आले. ‘ओपीडी’त १,६४२ रुग्णांची तपासणी झाली. घाटीत बहुतांश रुग्ण, नातेवाईक आणि घाटीतील कर्मचारी मास्क, रुमाल लावून ये-जा करताना दिसून आले. रिक्षाचालकांनीही मास्क लावण्यावर भर दिल्याचे दिसून आले. खबरदारीची सूचनारुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत आहे. सदर रुग्णाने नारळाचे पाणी घेतले आहे. सध्या प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती मेडिसिन विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी दिली. याठिकाणी उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनाही आवश्यक ती खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. रुग्णाला अचानक व्हेंटिलेटरची गरज भासली तर कोणतीही अडचण होणार नाही, यासाठी ४ व्हेंटिलेटरची व्यवस्था ‘सीव्हीटीएस’मध्ये करण्यात आलेली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी