शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
4
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
5
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
6
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
7
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
8
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
9
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
10
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
11
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
12
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
13
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
14
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
15
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
16
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
17
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
18
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
19
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
20
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."

corona virus : मृत्यूची ‘चेन ब्रेक’ होईना ! औरंगाबादेत रुग्णसंख्या घटली तरी मृतांची संख्या घटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 17:53 IST

corona virus : मार्च महिन्यात २९२, एप्रिल महिन्यात ४२३ नागरिकांचा बळी कोरोनाने घेतला.

ठळक मुद्देमार्च आणि एप्रिल महिन्यात कोरोना मृत्यू सत्राने अक्षरशः तांडव घातले. ती यापेक्षा कितीतरी पट अधिक असून भयावह आहे.

औरंगाबाद : कोरोनाचे १५ हजार सक्रिय रुग्ण असतानाही जिल्ह्यात मृत्यूची संख्या जेवढी होती तेवढी आजही कायम आहे. रुग्णसंख्या कमी झाली असली तरी मृत्यू सत्राची चेन ब्रेक होण्यास तयार नाही. त्यामुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. कोरोनाचे मृत्यूसत्र अखेर रोखावे तरी कसे असा प्रश्न यंत्रणेला पडला आहे. मृत्यूदरात दररोज औरंगाबाद जिल्ह्याचा क्रमांक राज्यात तिसरा किंवा चौथा असतो.

मार्च आणि एप्रिल महिन्यात कोरोना मृत्यू सत्राने अक्षरशः तांडव घातले. मार्च महिन्यात २९२, एप्रिल महिन्यात ४२३ नागरिकांचा बळी कोरोनाने घेतला. कोरोना संशयित मृत्यूची संख्या वेगळी करण्यात येते. ती यापेक्षा कितीतरी पट अधिक असून भयावह आहे. मार्च महिन्यात ७१९ संशयित, एप्रिलमध्ये १७६२ कोरोना संशयितांचा मृत्यू झाल्याची नोंद महापालिकेच्या दप्तरी आहे. मे महिन्यातही मृत्यू सत्र थांबायला तयार नाही. विशेष बाब म्हणजे शहरातील खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या अत्यंत कमी झालेली आहे. शहरात सध्या १३४३ सक्रिय रुग्ण आहेत.

२ हजार ८४५ जणांचा मृत्यूजिल्ह्यात मागील १५ महिन्यांमध्ये २ हजार ८४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील १ हजार ७२७ रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. आजही शहरात दररोज ५० ते ७० रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यातील कोरोना म्हणून २२ ते २५ जण, उर्वरित मृत्यू संशयित म्हणून नोंद घेण्यात येते.

दुसऱ्या लाटेत संसर्ग गंभीरपहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत रुग्ण अधिक गंभीर होत आहेत. औषधोपचार करण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही. गंभीर निमोनिया असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने मृत्यूची संख्या वाढलेली आहे. आता कमी वय असलेले रुग्णही दगावत आहेत.- डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी मनपा.

मे महिन्यातील मृत्यूतारीख- मृत्यूसंख्या१३ - २२१२ - २७११ - १७१० - २४०९ - २२०८ - २४०७ - २६०६ - २५०४ - २८०४ - ४३०३ - ३१०२ - २८०१ - १७

शहरातील सक्रिय रुग्णस्थितीघाटी-७३सिव्हिल -८२खासगी रुग्णालये -१३२मेल्ट्रॉन हॉस्पिटल - १२२कोविड केअर सेंटर- ४२१होम आयसोलेशन - ५२३

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद