शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
4
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
5
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
6
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
7
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
8
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
9
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
10
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
11
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
12
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
13
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
14
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
15
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
16
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
17
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
18
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
19
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
20
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."

corona virus : कोरोना तपासणीत राज्यात घाटी रुग्णालयातील प्रयोगशाळा राज्यात पहिल्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 12:52 IST

corona virus testing सर्वाधिक तपासण्या करण्यात पुण्यातील ‘एनआयव्ही’लाही टाकले मागे 

ठळक मुद्देतब्बल ३ लाख ९ हजार ७८८ आरटीपीसीआर तपासण्या

औरंगाबाद : कोरोना तपासणीत राज्यातील शासकीय प्रयोगशाळांमध्ये सर्वाधिक आरटीपीसीआर तपासण्या करण्यामध्ये औरंगाबादेतील घाटी रुग्णालातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा (व्हीआरडीएल) पहिल्या क्रमाकांवर आहे. या प्रयोगशाळेने आतापर्यंत तब्बल ३ लाख ९ हजार ७८८ तपासण्या केल्या आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या प्रारंभी कोरोनाच्या निदानासाठी पुण्यातील ‘एनआयव्ही’ अवलंबून राहावे लागत होते. या ‘एनआयव्ही’लाही घाटीतील प्रयोगशाळेने मागे टाकले आहे.

सर्वाधिक आरटीपीआर तपासण्या करणाऱ्या राज्यातील २५ शासकीय प्रयोगशाळांची यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. या यादीत घाटीतील प्रयोगशाळा पहिल्या क्रमांकावर आहे. घाटीत २९ मार्च २०२० रोजी विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे (व्हीआरडीएल) यंत्र कार्यान्वित झाले आणि जिल्ह्यातच कोरोनाचे निदान होण्याची सुविधा सुरू झाली. यासाठी अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर, सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डाॅ. ज्योती बजाज-इरावणे यांनी परिश्रम घेतले. २९ मार्च २०२० रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल एक संशयित आणि खाजगी रुग्णालातील एक संशयित, अशा दोघांचे स्वॅब घाटीत सर्वप्रथम दाखल झाले होते. पूर्वी रोज २०० तपासण्या करण्याची क्षमता होती. ही क्षमता आता २ हजारांवर गेली आहे आणि लवकरच रोज ३ हजार तपासण्यांची क्षमता होणार असल्याचे घाटी प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर कोरोना आहे की नाही, याचे निदान होण्यासाठी रुग्णांचे स्वॅब पुणे येथील ‘एनआयव्ही’ला पाठवावे लागत होते. तेव्हा त्याचा अहवाल येण्यासाठी २ ते ३ दिवसांची प्रतीक्षा करावी लागत असते; परंतु घाटीत तपासणीची सुविधा सुरू झाल्यानंतर काही तासांमध्ये अहवाल मिळणे सुरू झाले.

क्षमता आणखी वाढणारगतवर्षी मार्चमध्ये प्रयोगशाळा सुरू केली. पाहता पाहता तेथील यंत्रसामुग्री, मनुष्यबळ वाढले. सुरुवातील २०० टेस्ट होत असत. सध्या १,८०० ते २ हजारांपर्यंत तपासण्या होत आहेत. ही क्षमता लवकरच ३ हजारांपर्यंत जाणार आहे. सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डाॅ. ज्योती बजाज-इरावणे आणि त्यांच्या विभागाच्या अथक प्रयत्नांनी हे शक्य झाले. प्रयोगशाळेसाठी जिल्हा प्रशासनाची मोठी मदत झाली.-डाॅ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी

विद्यापीठातील प्रयोगशाळा १४ व्या क्रमाकांवरडाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळा १४ व्या क्रमाकांवर आहे. याठिकाणी आतापर्यंत १ लाख ६५ हजार ७७९ आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या आहेत. औरंगाबादेत दोन प्रयोगशाळांच्या माध्यमातून कोरोनाचे निदान होत आहे.

आरटीपीसीआर तपासणीची स्थितीप्रयोगशाळा-             एकूण तपासण्या१) घाटी, औरंगाबाद-             ३,०९,७८८२) एनआयव्ही, पुणे-             ३,०२,७८८३) बीजेजीएमसी, पुणे-            २,९९,८८०४) आरसीएसएम जीएमसी कोल्हापूर- २,७६,९१२५) एमएमटीएच, नवी मुंबई-            २,६९,१४०

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद