शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात ५६८ कोरोनाबाधितांची वाढ; ६०० रुग्णांना सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 12:11 IST

Corona Virus : जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ३८ हजार ३५ एवढी झाली आहे, तर आतापर्यंत एक लाख २८ हजार ७४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यात उपचारादरम्यान २७ रुग्णांचा मृत्यू  सध्या जिल्ह्यात ६,३२६ रुग्णांवर सुरू उपचार आहेत 

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात ५६८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि ६०० रुग्ण उपचार घेऊन घरी परतले, तर गेल्या २४ तासांत २७ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील १८ आणि अन्य जिल्ह्यांतील ९ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या ६ हजार ३२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ३८ हजार ३५ एवढी झाली आहे, तर आतापर्यंत एक लाख २८ हजार ७४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत २,९६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ५६८ नव्या रुग्णांत शहरातील १७४, तर ग्रामीण भागामधील ३९४ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील १२८ आणि ग्रामीण भागातील ४७२ अशा ६०० रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना म्हाडा काॅलनीतील ३२ वर्षीय पुरुष, पैठण येथील ५० वर्षीय महिला, चित्तेपिंपळगाव येथील ६२ वर्षीय महिला, बिडकीन, पैठण येथील ५३ वर्षीय पुरुष, शिवाजीनगर, सिल्लोड येथील ५५ वर्षीय पुरुष, पाचेलगाव, पैठण येथील ६० वर्षीय महिला, लाडगाव रोड, वैजापूर येथील ६० वर्षीय महिला, खोपेश्वर, गंगापूर येथील ४५ वर्षीय पुरुष, खंडाळा, वैजापूर येथील ६२ वर्षीय महिला, कन्नड येथील ६५ वर्षीय पुरुष, नाईकनगर, बीड बायपास येथील ५८ वर्षीय पुरुष, फुलंब्रीतील ४५ वर्षीय महिला, ब्रीजवाडी, चिकलठाणा येथील ५४ वर्षीय महिला, पैठणखेडा येथील ४५ वर्षीय महिला, सांजखेडा येथील ५५ वर्षीय पुरुष, पिसादेवी रोड परिसरातील ७० वर्षीय महिला, शिवाजीनगर येथील ६७ वर्षीय पुरुष, उपळा, कन्नड येथील ७६ वर्षीय पुरुष आणि बीड जिल्ह्यातील ६२ वर्षीय महिला, अहमदनगर जिल्ह्यातील ४२ वर्षीय पुरुष, ५१ वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय महिला, ४६ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय पुरुष जालना जिल्ह्यातील ६६ वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय महिला, ५३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णसातारा परिसर ४, बीड बायपास ४, शिवाजीनगर ४, गारखेडा परिसर २, घाटी १, मिलिटरी हॉस्पिटल १, पेठेनगर १, श्रेयनगर १, मुकुंदवाडी ५, एन-४ येथे २, रामनगर १, देवळाई १, विशालनगर १, हर्सूल १, मुकुंदनगर १, जयभवानीनगर २, नंदनवन कॉलनी २, गुरुसहानीनगर १, न्यू हनुमाननगर १, भीमनगर भावसिंगपुरा २, शहानूरमियॉ दर्गा रोड १, दहीफळे कोविड सेंटर १, भवानीनगर १, भावसिंगपुरा १, बालाजीनगर ३, नारेगाव १, म्हाडा कॉलनी २, एन-६ येथे ३, एन-२ येथे २, टी.व्ही.सेंटर २, हिमायतबाग ३, एन-११ येथे ३, नाथनगर २, राधास्वामी कॉलनी ३, मयूरपार्क ३, सुरेवाडी ३, कांचनवाडी ३, द्वारकादासनगर २, एन-१ येथे १, रोशन गेट १, नागेश्वरवाडी १, एन-९ येथे ३, अयोध्यानगर १, एन-८ येथे १, एन-७ येथे ४, अलोकनगर ३, चेतनानगर १, ऊर्जानगर १, नाईकनगर १, नागसेननगर १, देवळाई चौक १, श्रेयनगर १, शक्तीनगर १, प्रतापनगर २, बेगमपुरा १, काल्डा कॉर्नर ३, पडेगाव २, शेषाद्री प्रिस्टिंग २, सुधाकरनगर १, खोकडपुरा १, माऊलीनगर १, एसआरपीएफ कॅम्प १, म्हाडा कॉलनी मूर्तिजापूर १, भक्तीनगर १, शहागंज २, राजनगर १, नंदनवन कॉलनी १, जुनाबाजार १, ईटखेडा १, वसंतनगर १, एन-१३ येथे १, अन्य ५४.

ग्रामीण भागातील रुग्णबजाजनगर ५, वडगाव कोल्हाटी २, तिसगाव १, सिडको वाळूज महानगर-१ येथे २, विटा, ता. कन्नड १, रामगड तांडा १, चितेपिंपळगाव १, सावंगी हर्सूल ३, खुलताबाद १, नागमठाण, ता. वैजापूर १, सिल्लोड १, चितेगाव १, मांडकी ३, दौलताबाद ३, रांजणगाव १, संजीवनी सोसायटी १, वडखा १, ग्रामीण १, पैठण २, करंजखेडा १, सालीवाडा ता. खुलताबाद १, अन्य ३५८.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद