शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
6
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
7
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
8
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
9
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
10
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
11
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
12
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
13
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
14
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
17
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
18
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
19
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
20
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...

Corona Virus : दिलासा ! औरंगाबाद शहरात तीन महिन्यांनंतर कोरोना रुग्णसंख्या शंभराखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 12:08 IST

Corona Virus : बुधवारी शहरात ९९, तर ग्रामीण भागांत २१९ रुग्णांची वाढ 

ठळक मुद्देजिल्ह्यात उपचारादरम्यान २१ रुग्णांचा मृत्यू सध्या जिल्ह्यात ४,८७१ रुग्णांवर उपचार सुरू 

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ३१८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ९९, तर ग्रामीण भागातील २१९ रुग्णांचा समावेश आहे. तब्बल ३ महिन्यांनंतर शहरातील रुग्णसंख्या शंभराखाली आली. दिवसभरात ४४२ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. तर गेल्या २४ तासांत २१ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील १७ रुग्णांचा आणि अन्य जिल्ह्यातील ४ रुग्णांचा समावेश आहे. यात दोन रुग्णांना कोरोनासह म्युकरमायकोसिसचे निदान झाले होते.

जिल्ह्यात सध्या ४ हजार ८७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.शहरात १६ फेब्रुवारी रोजी ९६ रुग्ण आढळले होते. त्यानंतर शंभरावर रुग्णसंख्या गेली होती. शहरातील रुग्णसंख्येने एक हजाराचाही आकडा पार केला होता; परंतु ही संख्या शंभराखाली आली आहे. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ४१ हजार ४५१ एवढी झाली आहे, तर आतापर्यंत एक लाख ३३ हजार ४५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,१२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील २०० आणि ग्रामीण भागातील २४२ अशा ४४२ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना सिल्लोड येथील २९ वर्षीय पुरुष, सातारा परिसरातील ७७ वर्षीय पुरुष, व्यकंटेश काॅलनीतील ५६ वर्षीय महिला, शाहसोक्ता काॅलनीतील ३२ वर्षीय महिला, कन्नड येथील ४५ वर्षीय महिला, हनुमाननगर, गंगापूर येथील ४१ वर्षीय पुरुष, हर्सूल येथील ६० वर्षीय महिला, पडेगाव येथील ५५ वर्षीय पुरुष (म्युकरमायकोसिस), वांजरगाव, वैजापूर येथील ६५ वर्षीय पुरुष, धोंदलगाव, वैजापूर येथील ५० वर्षीय महिला, वजनापूर,गंगापूर येथील ६५ वर्षीय महिला, मयूर पार्क येथील ८८ वर्षीय महिला, केकटजळगाव, पैठण येथील ६० वर्षीय महिला, गव्हाली, कन्नड येथील ३३ वर्षीय पुरुष, शिवराई (बनशेंद्रा), कन्नड येथील ६५ वर्षीय महिला, मिलकार्नर येथील ४६ वर्षीय पुरुष, उल्कानगरी येथील ७६ वर्षीय पुरुष आणि जालना जिल्ह्यातील ७५ वर्षीय महिला, निलंगा, लातूर येथील ६५ वर्षीय पुरुष (म्युकरमायकोसिस), अहमदनगर जिल्ह्यातील ३५ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णऔरंगाबाद ३, सातारा परिसर ३, बीड बायपास १, जय भवानी नगर ३, पुष्पनगरी १, कांचनवाडी १, सिल्कमिल कॉलनी १, घाटी २, जुने शहर १, एन-११ येथे ३, मयुरबन कॉलनी १, बन्सीलालनगर १, भावसिंगपुरा ३, मुकुंदवाडी १, राजनगर ३, एन-६ येथे १, एन-२ येथे २, न्यू एस. टी. कॉलनी १, रामकृष्ण नगर १, राम नगर २, चिकलठाणा १, नारेगाव १, एन-८ येथे १, एन-७ येथे १, म्हाडा कॉलनी १, दिशा विनायक परिसर १, दिशानगरी १, देवळाई रोड १, शहानूरवाडी २, चेतक घोडा १, ज्योतीनगर १, न्यु पहाडसिंगपूरा १, मयुरपार्क १, टी. व्ही. सेंटर २, पडेगाव ५, एन-१ येथे २, घृष्णेश्वर कॉलनी २, जाधववाडी १, हडको १, ईएसआयसी हॉस्पीटल १, मिटमिटा १, संजय नगर १, रेणूकुल भगवती कॉलनी १, एसबीएच कॉलनी १, अल्तमश कॉलनी १, आंबेडकरनगर १, देवळाई परिसर १, नाथप्रांगण गारखेडा १, समर्थनगर ३, पद्मपूरा १, ईटखेडा १, एमआयडीसी कॉलनी रेल्वेस्टेशन १, मिलिट्री हॉस्पिटल १, एन-५ येथे १, अन्य २०

ग्रामीण भागातील रुग्णबजाजनगर ३, वडगाव कोल्हाटी १, गौर पिंप्री ता.कन्नड १, साऊथ सिटी १, पवननगर, रांजणगाव १, सिडको वाळूज महानगर-१ येथे २, गुडम तांडा १, विश्वबन सोसायटी हिरापूर ३, पिसादेवी ३, कासोद ता. सिल्लोड १, बिडकीन ता. पैठण १, खंडाळा ता. सिल्लोड १, एफडीसी सोसायटी १, न्यु जोगेश्वरी ता. गंगापूर १, गोर पिंपरी १, आडगाव बुद्रुक १, लक्ष्मीनगर, वाळूज १, पैठण १, लाडसावंगी १, अन्य १९३

रुग्णाचा पत्ता वेगवेगळाएका मयत रुग्णाचा पत्ता घाटीने अहमदनगर येथील असल्याचे नमूद केले आहे; परंतु हा रुग्ण शहरातील असल्याचे माहिती कार्यालयातर्फे देण्यात आले.. रुग्णांचे पत्ते नमूद करण्यात घोळ होत असल्याची स्थिती पहायला मिळत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद