corona virus : दिलासा ! जिल्ह्यात ४५ दिवसांनंतर कोरोना रुग्णसंख्या एक हजाराखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 12:57 PM2021-04-28T12:57:56+5:302021-04-28T12:59:38+5:30

सध्या जिल्ह्यात १२,४९८ रुग्णांवर उपचार सुरू

corona virus : Comfort! After 45 days in the district, the number of corona patients is less than one thousand | corona virus : दिलासा ! जिल्ह्यात ४५ दिवसांनंतर कोरोना रुग्णसंख्या एक हजाराखाली

corona virus : दिलासा ! जिल्ह्यात ४५ दिवसांनंतर कोरोना रुग्णसंख्या एक हजाराखाली

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात मंगळवारी ९५८ रुग्णांची वाढ, ४२ मृत्यूउपचारानंतर १,४०९ रुग्णांना सुटी

औरंगाबाद : जिल्ह्यात तब्बल ४५ दिवसांनंतर मंगळवारी कोरोना रुग्णांची संख्या हजाराखाली आली. दिवसभरात ९५८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि १,४०९ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. गेल्या २४ तासांत ४२ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील २६ आणि अन्य जिल्ह्यांतील तब्बल १६ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात १४ मार्च रोजी पहिल्यांदा हजारांवर कोरोना रुग्णांची वाढ झाली होती. त्यानंतर रोज हजार ते दीड हजारांदरम्यान रुग्णांची भर पडत गेली. यात काही दिवस रुग्णसंख्या २ हजारांजवळ गेली. परंतु गेल्या काही दिवसांपासून रोज निदान होणाऱ्या रुग्णांचा आलेख घसरत आहे. त्यामुळे दिलासा व्यक्त होत आहे. जिल्ह्यात सध्या १२,४९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या एक लाख २० हजार ५६६ झाली आहे, तर आतापर्यंत एक लाख ५ हजार ६४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत २,४२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ९५८ नव्या रुग्णांत शहरातील ५०४, तर ग्रामीण भागामधील ४५४ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ६५९ आणि ग्रामीण भागातील ७५० अशा १,४०९ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना जाधववाडी, हडको येथील ५५ वर्षीय महिला, मिल काॅर्नर येथील ७० वर्षीय पुरुष, टिळकनगर, सिल्लोड येथील ६५ वर्षीय पुरुष, पैठण येथील ४० वर्षीय पुरुष, चिस्तिया काॅलनी, एन-६ येथील २५ वर्षीय महिला, सिल्लोड येथील ७४ वर्षीय महिला, गेवराई येथील ६५ वर्षीय पुरुष, मिल काॅर्नर येथील ५५ वर्षीय महिला, समतानगर येथील ६० वर्षीय महिला, सिल्लोड येथील २८ वर्षीय पुरुष, पिंपरी येथील ७० वर्षीय महिला, एन-८ येथील ६३ वर्षीय महिला, दत्तनगर, वैजापूर येथील ६३ वर्षीय महिला, पावरी सोयगाव येथील एक महिन्याचा मुलगा, डाभरूल तांडा, पैठण येथील ७३ वर्षीय पुरुष, चौका येथील ८० वर्षीय पुरुष, बनोटी तांडा येथील ७० वर्षीय पुरुष, मोहरा, कन्नड येथील ५६ वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथील ६० वर्षीय महिला, वाळूज येथील ३२ वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ७० वर्षीय महिला, वाहेगाव डोमनी, गंगापूर येथील महिला, लाडसावंगी येथील ५५ वर्षीय महिला, चिकलठाणा येथील ५६ वर्षीय महिला, पडेगाव येथील ५४ वर्षीय महिला, क्रांतीचौक येथील ८६ वर्षीय महिला आणि परभणी जिल्ह्यातील ६० वर्षीय पुरुष, नांदेड जिल्ह्यातील ४५ वर्षीय महिला, जालना जिल्ह्यातील ७० वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय पुरुष, ६२ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय पुरुष, ४० वर्षीय पुरुष, अहमदनगर जिल्ह्यातील ७१ वर्षीय पुरुष, ७० वर्षीय पुरुष, ७२ वर्षीय महिला, ५५ वर्षीय महिला, ६४ वर्षीय पुरुष, ६९ वर्षीय महिला, बीड जिल्ह्यातील ६ वर्षीय बालिका, बुलढाणा जिल्ह्यातील ६० वर्षीय महिला, लातूर येथील ८५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण
एन-९, सिडको २, एन-१, सिडको १, एन-३, सिडको-१, एन-७, सिडको ४, एन-१३ येथे १, एन-४, सिडको ३, एन-६, सिडको ४, एन-१२, हडको १, एन-११, हडको ५, एन-५, सिडको ३, एन-८, सिडको ६, एन-२ सिडको १, बीड बायपास परिसर ९, कैलासनगर १, रेल्वे स्टेशन परिसर ३, व्हिजन सिटी १, कांचनवाडी ९, नक्षत्रवाडी २, भानुदासनगर ३, मुकुंदवाडी ७, गोकुळनगर १, हर्सूल १७, मयूरपार्क १३, कृष्ण मंगल कार्यालय १, जटवाडा रोड परिसर ३, सातारा परिसर १६, मित्रनगर १, मिटमिटा १, म्हाडा कॉलनी ३, साकारनगर १, जय भवानीनगर ८, रामनगर २, न्यू हनुमाननगर ४, संत तुकोबानगर -१, विश्रांतीनगर १, अंबिकानगर १, इंदिरानगर ३, महालक्ष्मी चौक १, चिकलठाणा ६, गोकुळ १, धूत हॉस्पिटल परिसर १, सिंधी कॉलनी २, आकाशवाणी १, उल्कानगरी ५, एस.टी. कॉलनी १, श्रीरामनगर १, बाळकृष्णनगर १, स्पदंननगर १, रामनगर २, जवाहर कॉलनी २, शिवेश्वर कॉलनी १, सेवन हिल १, शहानुरवाडी ३, गारखेडा परिसर १३, विशालनगर ११, अजिंक्यनगर १, देवानगरी १, पदमपुरा ३, शिवशंकर कॉलनी ३, कल्पतरू हौ. सौ १, बालाजीनगर १, पुंडलिकनगर १, शिवाजीनगर २, बंजारा कॉलनी १, साईनगरी १, ज्योतीनगर १, प्रतापनगर १, उस्मानपुरा २, मयूरबन कॉलनी २, शंभूनगर १, न्यायनगर १, एकनाथनगर १, कार्तिकनगर १, मोहन टॉकीज परिसर १, जाधववाडी ३, छत्रपतीनगर १, नारेगाव ३, प्रकाश नगर १, पिसादेवी ३, भावसिंगपुरा १, शिवाजी नगर १, हिमायतबाग १, रोशन गेट १, जयसिंगपुरा १, रेणुकानगर २, राजनगर १, देवळाई परिसर २, म्हस्के पेट्रोल पंप १, कासलीवाल मार्वल २, पेशवेनगर १ आर. जे. स्कूल परिसर १, राजगुरूनगर १, शास्त्रीनगर १, खडकेश्वर २, चाऊसनगर १, खादी रोड परिसर १, दिशानगरी १, विजयंत नगर १, पेठेनगर १, भीमनगर २, रचनाकार कॉलनी १, शेंद्रा २, मकसूद कॉलनी १, श्रीकृष्णनगर १, लाडसावंगी १, अयोध्या नगर १, पैठण रोड परिसर १, भारतनगर १, भगतसिंगनगर १, सिव्हिल हॉस्पिटल १, पडेगाव १, अन्य २२८.

ग्रामीण भागातील रुग्ण
पवननगर, पैठण १, पैठण ४, रांजणगाव १, वाळूज ३, वैजापूर २, बजाजनगर ११, सिडको महानगर-१ येथे १, घानेगाव १, लाडगाव १, सिल्लोड ४, कन्नड ३, महाल पिंप्री १, शेवगाव १, चिंचोली १, गंगापूर १, लिंबेजळगाव ६, फुलंब्री ३, तिसगाव १, चौका १, खुलताबाद १, भडगाव १, रहिमाबाद १, अब्दीमंडी १, माळीवाडा १, वडगाव १, अन्य ४०२.

Web Title: corona virus : Comfort! After 45 days in the district, the number of corona patients is less than one thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.