शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine : कोरोना लसीचा प्रचंड तुटवडा; शहरात पाच हजार लस दीड तासातच संपल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 19:28 IST

Corona Vaccine shortage in Aurangabad : ज्या नागरिकांनी ८४ दिवसांपूर्वी लस घेेतली होती, त्यांना आता दुसरा डोस हवा आहे. 

ठळक मुद्देपहिला डोस बंद करण्याचा मनपाचा विचार

औरंगाबाद : शहरात लसची मागणी प्रचंड वाढली आहे. दुसऱ्या डोससाठी ७० हजारांहून अधिक नागरिक वेटिंगवर आहेत. केंद्र शासनाकडून लसचा पुरवठा मुबलक प्रमाणात मिळत नसल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत सोमवारी रात्री मनपाला फक्त ५ हजार डोस उपलब्ध करून देण्यात आले. मंगळवारी सकाळी अवघ्या दीड ते दोन तासांत डोस संपले. बुधवारी लसीकरण बंद ठेवण्यात येणार आहे. लसची गरज लक्षात घेता पहिला डोस काही दिवसांसाठी बंदच करण्याचा विचार आरोग्य विभागाने सुरू केला आहे. (Five thousand corona vaccines were end in the city in one and a half hours )

लोकसंख्येच्या प्रमाणात औरंगाबाद शहराला लस उपलब्ध करून दिली जात आहे. शहरात दररोज २० हजार लस देण्याची यंत्रणा मनपाने उभी केली. शासनाकडून साठा उपलब्ध होत नसल्याने ११५ पैकी ३९ ते ४० लसीकरण केंद्रे सुरू ठेवण्यात येत आहेत. आठवड्यातून एक किंवा दोन वेळेसच लसीकरण होत आहे. ज्या नागरिकांनी ८४ दिवसांपूर्वी लस घेेतली होती, त्यांना आता दुसरा डोस हवा आहे. 

दुसऱ्या डोससाठीच राखीव ठेवण्याचा विचारमहापालिकेच्या आरोग्य केंद्रांवर पहाटे पाच वाजल्यापासून रांगा लागतात. प्रत्येक केंद्राला फक्त १५० लस देण्यात येत असून, सकाळी टोकन मिळविण्यासाठी रांगा लागत आहेत. लस न मिळाल्याने अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागते. मनपा प्रशासनाने अनेकदा शासनाकडे वाढीव प्रमाणात लस द्यावी, अशी मागणी केली आहे. मात्र, काहीच उपयोग झाला नाही. यापुढे शासनाकडून उपलब्ध होणारी लस फक्त दुसऱ्या डोससाठीच राखीव ठेवण्याचा विचार मनपा करीत आहे. लवकरच यासंदर्भात घोषणा करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी नमूद केले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका