शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मृत महिलेला टोचली चक्क कोरोनाची लस, सिल्लोड तालुक्यातील प्रकार, आरोग्य खात्यातील सावळागोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 06:23 IST

Aurangabad : उंडणगाव (ता. सिल्लोड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पार्वताबाई अहेलाजी पाटील (७८) यांनी १८ डिसेंबर २०२१ रोजी १ वाजून ५ मिनिटांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतल्याची नोंद आहे.

- रघुनाथ सावळे 

उंडणगाव (जि. औरंगाबाद) : कोरोनाने मयत झालेल्या महिलेवर  आरोग्य यंत्रणेनेच अंत्यसंस्कार केले आणि त्यानंतर चक्क सात महिन्यांनी १८ डिसेंबर रोजी तिला कोविडचा पहिला डोस दिल्याचा संदेश पाठवल्याने  आरोग्य खात्यामधला सावळागोंधळ पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. 

उंडणगाव (ता. सिल्लोड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पार्वताबाई अहेलाजी पाटील (७८) यांनी १८ डिसेंबर २०२१ रोजी १ वाजून ५ मिनिटांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतल्याची नोंद आहे. याबाबत त्यांच्या  मुलगा सूर्यभान पाटील यांच्या मोबाइलवर  पार्वताबाई यांनी कोविशिल्ड लस घेतल्याचा संदेश आला. त्यानंतर त्यांचे लसीकरण झाले असल्याचे प्रमाणपत्रसुद्धा आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आले आहे.  

उपचारादरम्यान झाला होता मृत्यू पार्वताबाई या २१ एप्रिलला आजारी पडल्याने त्यांना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल केले. कोरोना चाचणीत त्या पाॅझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर घाटीतच उपचार सुरू होते. यादरम्यान त्यांचे २ मे रोजी निधन झाले. पार्वतीबाईंच्या मृत्यूची घाटी रुग्णालयासह सिडको पोलीस ठाण्यात नोंद असून, सिडको एन-८ भागातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्याची नोंद आहे.

- अहेलाजी पाटील (७८) यांनी १८ डिसेंबर २०२१ रोजी १ वाजून ५ मिनिटांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतल्याची नोंद करण्यात आली आहे. 

 - अंत्यसंस्कानंतर चक्क ७ महिन्यांनी १८ डिसेंबर रोजी दिला कोविडचा पहिला डोस 

अशी चूक शक्यच नाहीया प्रकाराची चौकशी करू; पण असे होणे अशक्य आहे. याबाबत वरिष्ठांना माहिती देऊन तातडीने चौकशी करण्यात येईल.- डॉ. अर्चना सपकाळ, वैद्यकीय अधिकारी प्रा.आ. केंद्र, उंडणगाव

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAurangabadऔरंगाबाद