शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

फ्रंटलाईन योद्ध्यांचे लसीकरण; पोलीस आयुक्त, पोलीस अधिक्षकांनी घेतली कोरोना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 18:47 IST

Corona vaccine पोलीस आयुक्त डाॅ. निखील गुप्ता, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, पोलीस उपायुक्त मीना मकवाना यांनी लस घेतली

ठळक मुद्देलस सुरक्षित असल्याचे केले आवाहन

औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयात पोलीस आयुक्त डाॅ. निखील गुप्ता, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, पोलीस उपायुक्त मीना मकवाना यांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईतील ढाल म्हणजेच कोरोना प्रतिबंध लसीचा पहिला डोस घेतला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लस घेतल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये लस टोचून घेण्यासाठीचा उत्साह शनिवारी दिसून आला.

पोलीस आयुक्त डाॅ. गुप्ता व पोलीस अधीक्षक पाटील लसीकरणासाठी येणार असल्याची माहीती मिळताच जिल्हा रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांची उत्सुकता वाढली होती. परिचारिका रेश्मा शेख यांनी लस टोचली. त्यांनी लसीकरणानंतर डाॅक्टरांशी चर्चा केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डा. सुंदर कुलकर्णी, मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. निता पाडळकर, अतिरीक्त जिल्हा शल्यचिकित्सक डा्ॅ. कमलाकर मुदखेडकर, डाॅ. संतोष नाईकवाडे, परिचारीका कुसुम भालेराव यांची यावेळी उपस्थिती होती.

लस घ्या, त्रिसुत्री पाळा, सहकार्य कराकोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढायला लागली आहे. लस घेतली म्हणजे कोरोना होणार नाही, असे नाही. लस घेतली असेल किंवा नसेल तरिही काळजी घेणे आवश्यक आहे. मी लस सुरक्षित आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनीही लस घ्यावी व त्रिसुत्रीचे पालन करावे असे आवाहन पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी केले. तर पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी ग्रामीण भागात कार्यक्रमांतून सोशल डिस्टंन्सींग, मास्क वापराकडे दुर्लक्ष होतांना दिसून येत असुन नागरीकांना सुरक्षिततेसाठी दिलेल्या निर्बंधाचे पालन करुन सहकार्य करावे तसेच लस सुरक्षित असुन जेव्हाही लस घेण्यासाठी बोलवण्यात येईल त्यावेळी येवून लस घ्यावी असे आवाहन केले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस