शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सुरु होण्यापूर्वी १५ हजार शिक्षकांच्या कोरोना टेस्टचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 16:50 IST

नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार

ठळक मुद्दे जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शाळेतील शिक्षकांची तपासणीग्रामीण भागात १० हजार ४१४ शिक्षकांची चाचणी

औरंगाबाद : जिल्ह्यातील ११७६ शाळांत ९ ते १२ वीचे वर्ग सोमवारपासून सुरू होत आहेत. या वर्गांना शिकविणाऱ्या १० हजार ४१४ शिक्षकांच्या सोमवारपूर्वी ‘आरटीपीसीआर’ तपासणी करावी लागणार असल्याची माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांनी  दिली. 

पुढील चार दिवसांत दर दिवशी किमान अडीच हजार तपासण्या करून त्यांचे अहवाल देण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर असणार आहे. नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्यासाठी बुधवारी दिवसभर बैठकांवर बैठका पार पडल्या. सकाळी १० ते ११ वाजेदरम्यान गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आणि शिक्षण विभागांची ऑनलाईन बैठक झाली. त्यानंतर ११ ते १२ वाजेपर्यंत शिक्षण आयुक्त विशाल सोळुंके यांनी तयारीची आढावा बैठक घेतली. त्यानंतर जिल्ह्यातील ५०० पेक्षा अधिक मुख्याध्यापकांशी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी बी. बी. चव्हाण व प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी ऑनलाईन संवाद साधत नियोजन केले. शाळा सुरू करण्यापूर्वी शाळेची स्वच्छता, निर्जंतुकीकरण, विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी थर्मलगन, पल्स ऑक्सिमीटर, मास्क, सॅनिटायझरची उपलब्धता शाळा व्यवस्थापनाला करावी लागणार आहे. 

२५ ते ३० टक्के पालकांचा प्रतिसादकाही शाळांनी पालकांशी यासंबंधी चर्चा केली. त्यात २५ ते ३० टक्केच पालक पाल्यांना शाळेत पाठविण्यात उत्सुक असल्याचे जाणवले आहे. मात्र, पालकांचे संमतीपत्र सोमवारपर्यंत जमा होतील. बहुतांश विद्यार्थी सोबत येतानाच संमतीपत्र घेऊन येतील. त्यामुळे पहिल्याच दिवशी १०० टक्के उपस्थिती अभिप्रेत नाही. काही जण चार- आठ दिवस वाट पाहून पाल्यांना शाळेत पाठविण्याची शक्यता आहे, असे डॉ. चव्हाण म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादTeacherशिक्षक