शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

corona in Aurangabad : अबब... दोनशेवर रुग्ण घरीच ‘ऑक्सिजन’वर, सिलिंडरसाठी धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 12:46 IST

corona in Aurangabad : रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी झालेले, न्यूमोनिया, दमा, दीर्घकालीन श्वसनाचे आजार, फुप्फुसात पाणी झाल्यास रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण अधिक कमी झाल्यास रुग्णास कृत्रिम ऑक्सिजनची गरज असते.

ठळक मुद्देपहिल्या लाटेच्या तुलनेत घरी असलेल्या रुग्णांची संख्या दुप्पटहोम आयसोलेशमध्ये १९९८ रुग्ण

औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात औरंगाबादेत तब्बल दोनशेवर रुग्ण सध्या घरातच ऑक्सिजन सिलिंडरवर आहेत. कोरोना पॉझिटिव्ह, कोरोना निगेटिव्हसह श्वसनाशी निगडित रुग्णांचा यात समावेश आहे. धक्कादायक म्हणजे कोरोनाचा पहिल्या लाटेच्या तुलनेत सध्या घरी ऑक्सिजन सिलिंडर वापरण्याच्या प्रमाणात दुप्पट झाली आहे.

विविध आजारांमध्ये रुग्णांना ऑक्सिजनची गरज असते. रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी झालेले, न्यूमोनिया, दमा, दीर्घकालीन श्वसनाचे आजार, फुप्फुसात पाणी झाल्यास रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण अधिक कमी झाल्यास रुग्णास कृत्रिम ऑक्सिजनची गरज असते. अशा अवस्थेत रुग्ण रुग्णालयात दाखल होतात. परंतु रुग्णालयात उपचार घेतल्यानंतरही अनेकांना घरीही ऑक्सिजन सिलिंडर लावावा लागत आहे. अनेक कोरोना पॉझिटिव्ह, निगेटिव्ह रुग्णांनाही ऑक्सिजनची गरज असते. त्यामुळे घरी ऑक्सिजन सिलिंडर वापरणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसते.

होम आयसोलेशमध्ये १९९८ रुग्णऔरंगाबादेत कोरोनाचे १९९८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये होते. घरात स्वतंत्र रूम, स्वतंत्र स्वच्छतागृह आणि घरी दिवसरात्र काळजी घेणारी व्यक्ती असलेल्या रुग्णांना होम आयसोलेशनसाठी परवानगी दिली जाते. या रुग्णांवर डॉक्टरांकडून लक्ष ठेवले जाते. यातील अनेक रुग्णही घरी ऑक्सिजनवर आहेत.

रोज ५ ते ६ सिलिंडरऑक्सिजन सिलिंडर एजन्सीचे सुजीत जैन म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या लाटेत घरी रोज २ ते ३ सिलिंडर दिले जात होते. आता हे प्रमाण रोजचे ५ ते ६ झाले आहे. डॉक्टरांची चिठ्ठी असल्याशिवाय कोणालाही सिलिंडर दिले जात नाहीत. सध्या जवळपास २०० रुग्णांसाठी लहान आणि जम्बो सिलिंडर दिलेले आहेत.

रोज सिलिंडरकोरोनावर उपचार घेऊन नातेवाईक घरी परतले आहेत. परंतु त्यांना ऑक्सिजन द्यावे लागत आहे. त्यासाठी रोज ऑक्सिजन सिलिंडर लागत आहे. आतापर्यंत काही अडचण आली नाही.- गौरव भिंगारे, एन-११

१० दिवसांपासून सिलिंडर नेतोघरातील सदस्यांसाठी १० दिवसांपासून ऑक्सिजन सिलिंडर घेऊन जात आहे. एक जम्बो सिलिंडर घेऊन गेल्यानंतर जवळपास १४ तास चालतो. त्यानंतर परत सिलिंडर घेऊन जावा लागतो.- कलीम खान, प्रिया काॅलनी

मोठ्या सिलिंडरची गरजघरातील नातेवाईकासाठी छोटे सिलिंडर घेऊन जातो. हे सिलिंडर मिळण्यास सध्या कोणतीही अडचण नाही. जम्बो सिलिंडरची मागणी केली आहे.- सोहेल खान

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद