शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
8
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
9
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
10
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
12
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
13
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
14
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
15
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
16
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
17
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
18
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
19
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
20
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'

मागील पाच परीक्षांमध्ये कॉपीचा गैरप्रकार; २०५ परीक्षा केंद्रांवरील शिक्षकांची अदलाबदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 20:12 IST

विभागीय मंडळांकडून गोपनीय साहित्याचे वाटप : केंद्रप्रमुखांना दिल्या सूचना

छत्रपती संभाजीनगर : मागील पाच परीक्षांमध्ये कॉपीचा गैरप्रकार उघडकीस आलेल्या विभागातील २०५ केंद्रांमधील केंद्रप्रमुख, सहकेंद्रप्रमुख, पर्यवेक्षकांसह परीक्षेशी संबंधित कामकाज करणाऱ्या शिक्षकांसह इतरांची अदलाबदल करण्याचे आदेश विभागीय मंडळाने दिले. त्यानुसार नव्याने नियुक्त झालेल्या पाच जिल्ह्यांतील केंद्रप्रमुखांकडे स. भु. शिक्षण संस्थेच्या गोविंदभाई श्रॉफ सभागृहात गुरुवारी (दि. ६) दिवसभर परीक्षेचे गोपनीय साहित्य सुपूर्द केल्याची माहिती विभागीय मंडळाच्या सचिव वैशाली जामदार यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षांना ११ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या परीक्षेसाठीची छत्रपती संभाजीनगर विभागातील पाच जिल्ह्यांमधील तयारी पूर्ण झाली आहे. शालेय शिक्षण विभागाने कॉपीमुक्त परीक्षेसाठी ज्या शाळेतील विद्यार्थी केंद्रांवर परीक्षा देणार आहेत, त्याठिकाणी संबंधित शाळेतील कोणताही व्यक्ती परीक्षेसाठी थांबणार नाही, अशा पद्धतीचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्यभरातून त्याला विरोध होऊ लागल्यामुळे शिक्षण विभागाने मागील पाच परीक्षांमध्ये ज्या केंद्रांवर किमान एक गैरप्रकार झालेला असेल तर त्याठिकाणच्या शिक्षकांच्या अदलाबदलीचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार विभागातील पाच जिल्ह्यांतील एकूण २०५ केंद्रांवर त्याच शाळेतील शिक्षक परीक्षेशी संबंधित कामकाजासाठी असणार नाहीत, असेही विभागीय सचिव जामदार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पाच जिल्ह्यांमध्ये एकूण ४६० परीक्षा केंद्र असणार आहेत. त्यातील २०५ केंद्रांवर शिक्षकांची अदलाबदली केली आहे.

परीक्षा केंद्रातील शिक्षकांची अदलाबदलजिल्हा...........................परीक्षा केंद्रछ.संभाजीनगर..................५६बीड..................................५१परभणी.............................३७जालना..............................३७हिंगोली...............................२४एकूण................................२०५-------------------------------------------

बारावीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थीजिल्हा...........................परीक्षा केंद्र..........................विद्यार्थीछ.संभाजीनगर..................१६१..................................६३,९१८बीड..................................१०६.................................४३,७५६परभणी.............................७१....................................२७,२३०जालना..............................८२.....................................३६,१६६हिंगोली...............................४०...................................१४,२६०एकूण................................४६०....................................१,८५,३३०

केंद्र संचालकांना दिलेल्या सूचना - गैरमार्गाचे प्रकरण आढळल्यास पुढील वर्षीपासून केंद्र मान्यता कायमस्वरूपी रद्द होणार.- खासगी क्लासेस व इतर कर्मचाऱ्यांची पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात येऊ नये.- परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था मंडळाच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार करावी.- केंद्रात विद्यार्थ्यांना तपासूनच सोडावे. त्यांच्याकडील असलेले साहित्य इमारतीबाहेरच काढून घ्यावे.- केंद्रात फक्त केंद्र संचालक व सहाय्यक परिरक्षक यांचाच मोबाईल सुरू राहील. उर्वरित सर्वांचे मोबाईल बंद असतील.- केंद्रावर गैरप्रकार घडल्यास केंद्र संचालकाने तत्काळ माध्यमिक शिक्षणाधिकारी व मंडळाला कळवावे.- विद्यार्थी, जमिनीवर, मंडपात, एका बाकावर दोन बसणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

गोपनीय साहित्याचेही वाटपबारावीच्या परीक्षेची संपूर्ण तयारी झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील दक्षता समिती, केंद्र संचालकांसोबत सतत बैठका सुरू आहेत. परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. विभागीय मंडळानेही सर्व तांत्रिक बाबी तपासून घेतल्या असून, केंद्र संचालकांपासून इतरांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. गोपनीय साहित्याचेही वाटप करण्यात आले आहे.- वैशाली जामदार, सचिव, विभागीय मंडळ

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरHSC / 12th Exam12वी परीक्षा