शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

भीषण आगीत कुलर कंपनी भस्मसात; तीन तासानंतर आगीवर मिळाले नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 16:11 IST

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील के -१५ या प्लॉटवरील आनंद कुलर इंडस्ट्रीजला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली.

औरंगाबाद : चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील के -१५ या प्लॉटवरील आनंद कुलर इंडस्ट्रीजला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक झाला. सुमारे एक कोटीहून अधिक रक्कमेचे या घटनेत नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली.  

साप्ताहिक सुटीमुळे कंपनीत एकही कामगार उपस्थित नसल्याने या  घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. आगीचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.चिकलठाणा एमआयडीसीमध्ये कुंदन रेड्डी यांचा कुलर बनविण्याचा कारखाना आहे. सुमारे ३० ते ३५ कामगार तेथे काम करतात. दरशुक्रवारी चिकलठाणा एमआयडीसीतील क ारखान्यांना साप्ताहिक सुटी असते. यामुळे रेड्डी यांच्या कंपनीचे कामगारही आज कामावर नव्हते. महावितरणने ट्रान्सफार्मर बसविण्याचे काम हाती घेतलेले असल्याने परिसरातील वीज पुरवठा आज सकाळपासून बंद होता. कंपनीचे अकाऊंटंट  मुळे आणि इतर चार कर्मचाऱ्यांनी कंपनीतील गणपतीची सकाळी  साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास आरती केली. आरतीचा दिवा विझल्यानंतर ते कंपनीचे कार्यालय बंद करून कंपनीबाहेरील ओट्यावर गप्पा मारत बसले होते. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अचानक कंपनीतून धूर निघू लागला. 

कंपनीतील साहित्याला आग लागल्याचे दिसताच कामगारांनी या घटनेची माहिती तातडीने पोलीस नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल आणि एमआयडीसी सिडको ठाण्याला कळविली.  माहिती मिळताच अवघ्या काही मिनिटात गरवारे कंपनीचे प्लांट हेड उर्किडे हे त्यांच्या कंपनीच्या बंबासह तेथे दाखल झाले. त्यापाठोपाठ एमआयडीसी, सिडको अग्निशमन दल, पदमपुरा येथील अग्निशमन विभाग आणि शेंद्रा एमआयडीसीचे अग्निशमन बंब घटनास्थळी  दाखल झाले. मात्र तापर्यंत आगीने भडका घेतला. कंपनीपासून सुमारे पाच ते सात किलोमिटरपर्यंतं धुराचे लोळ नजरेस पडत होते. सिडको एमआयडीसी ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे आणि अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

टॅग्स :fireआगAurangabadऔरंगाबादChikhalthana MIDCचिखलठाणा एमआयडीसी