शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अपघात दिसताच ताफा थांबवला; केंद्रीय मंत्री भागवत कराडांमधील ‘डॉक्टर’ उपचारासाठी तत्काळ धावला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2021 13:08 IST

Union Minister Bhagwat Karad: डॉ. भागवत कराड यांनी अपघात पाहून तातडीने घेतलेली धाव अनेकांना माणसुकीचे दर्शन देणारी ठरली.

ठळक मुद्देसुभेदारी विश्रामगृहाच्या रस्त्यावर रिक्षा उलटून अपघात झाला  डॉ. भागवत कराड यांनी जखमीला तातडीने उचलले, जागेवरच तपासले

औरंगाबाद : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड ( Bhagwat Karad ) यांच्यातील ‘डॉक्टर’ रविवारी एका अपघातप्रसंगी उपचारासाठी धावल्याने त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन अनेकांनी अनुभवले. केंद्रीय मंत्र्यांआधी डॉक्टर असलेले कराड यांना अपघात पाहून राहावले नाही. त्यांनी ताबडतोब जखमी मुलाला तपासले. जखमी किंवा रुग्णाला पाहून तातडीने धावून जाण्याला वैद्यकीय पेशात फार महत्त्व असते. राजकारणात गेल्यानंतर अनेक जण आपल्या मूळ व्यवसायापासून दूर जातात. परंतु डॉ. कराड यांनी अपघात पाहून तातडीने घेतलेली धाव अनेकांना माणसुकीचे दर्शन देणारी ठरली.

व्यवसायाने बालरोग तज्ज्ञ असलेले डॉक्टर आता केंद्रात अर्थराज्यमंत्री आहेत. धावपळीचा आणि व्यस्ततेचा त्यांचा दिनक्रम. शहरात दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल असल्यामुळे ते रविवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुभेदारी विश्रामगृहाच्या दिशेने जात असताना त्यांच्यासमोर अचानक एक रिक्षा उलटली. डॉ. कराड यांनी ताबडतोब आपला ताफा थांबवून तातडीने जखमींकडे धाव घेतली. २ लहान मुले जखमी झाली होती. डॉ. कराड यांनी स्वत:च्या खिशातील रुमाल काढून जखमी मुलाच्या ओठातून येणारा रक्तस्त्राव थांबविण्याचा प्रयत्न केला. त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी वाहनाच्या दिशेने नेले. तितक्यात त्या मुलाचे नातेवाईक आले. त्यांच्यासमोर डॉ. कराड यांनी मुलाला डोक्याला काही मार लागला आहे का, हे तपासले.

समोर अपघात झाल्यास मदत करावाहने जपून चालवा. कुठलाही अपघात आपल्यासमोर झाल्यास जखमींची मदत करा. असे आवाहन डॉ. कराड यांनी केले. तसेच अपघातात जखमीच्या डोक्याला मार लागला आहे का, यासाठी जागेवरच तपासणी केली. परंतु तसे काही नसल्यामुळे मुलांना कुटुंबीयांकडे सोपविले.

टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवतAurangabadऔरंगाबादAccidentअपघात