शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री अब्दुल सत्तार समर्थकांमुळे महायुतीत वादाचे सूर; भाजप मुख्यमंत्र्यांकडे विषय नेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 20:03 IST

महायुतीमध्ये असताना सत्तार समर्थकांनी माजी खा. इम्तियाज जलील आणि खा. कल्याण काळे यांचे छायाचित्र जाहिरातीमध्ये टाकले.

छत्रपती संभाजीनगर : पालकमंत्रिपदावर अब्दुल सत्तार यांची वर्णी लागल्यानंतर समर्थकांनी एकच जल्लोष केला. परंतु या जल्लोषामुळे महायुतीमध्ये वादाचे सूर छेडले गेले आहेत. सत्तार समर्थकांनी केलेल्या जाहिरातीमध्ये एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील आणि काँग्रेसचे खा. कल्याण काळे यांचे छायाचित्र आहे. ही बाब भाजपच्या जिव्हारी लागली आहे.

महायुतीमध्ये असताना असा प्रकार होणे योग्य नाही. यातून संभ्रमाचा संदेश जनसामान्यांत जात असल्याचे मत भाजपच्या गोटातून व्यक्त होत आहे. माजी खा. जलील हे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या विरोधातील उमेदवार होते. तर जालना-औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून माजी खा. रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार खा. कल्याण काळे उभे होते. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात जलील यांचा पराभव झाला. परंतु जालना-औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दानवे यांचा काळे यांनी पराभव केला. दानवेंचा पराभव त्यांच्यासह भाजपच्या जिव्हारी लागला. त्यातूनच दानवे आणि पालकमंत्री सत्तार यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या.

४ जूननंतर आजपर्यंत पाहिले तर दानवे आणि सत्तार यांच्यात वार-पलटवार सुरू आहेत. महायुतीमध्ये असताना सत्तार यांनी युतीधर्म न पाळता काँग्रेसचे काळे यांना मदत केल्याचा आरोप दानवे करीत आहेत. सत्तार यांनी देखील जाहीरपणे मदत केल्याचे सांगून दानवे यांना डिवचले. हा सगळा राजकीय धुरळा पाहिल्यानंतर सत्तार समर्थकांनी जलील आणि काळे यांचे छायाचित्र पालकमंत्रीपदी निवड झाल्याच्या शुभेच्छापर जाहिरातीमध्ये वापरल्यामुळे दानवे यांच्यासह भाजपच्या जिव्हारी लागल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्र्यांकडे विषय जाणार.....महायुतीमध्ये असताना सत्तार समर्थकांनी माजी खा. इम्तियाज जलील आणि खा. कल्याण काळे यांचे छायाचित्र जाहिरातीमध्ये टाकले. हा सगळा प्रकार चांगला नाही. तक्रार म्हणून नाही तरीही सगळा प्रकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर टाकण्यात येईल. तसेच त्यांच्या समर्थकांनी केलेला खोडसाळपणा निदर्शनास आणून देण्यात येईल. पालकमंत्री सत्तार यांनी समर्थकांना कुणाचे फोटो घ्यावेत, हे सांगणे अपेक्षित होते.-अतुल सावे, गृहनिर्माण मंत्री

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारMahayutiमहायुतीAurangabadऔरंगाबाद