शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादची शांतता भंग करण्यासाठी बनवला वादग्रस्त व्हिडिओ; तरुणावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 13:44 IST

व्हिडिओची गंभीर दखल घेत पोलिसांनी घटनेची शहानिशा केली तेव्हा अशी घटना घडलीच नसल्याचे तपासात समोर आले.

औरंगाबाद : शहराच्या शांततेला गालबोट लागावे, या उद्देशाने व्हिडिओ तयार करून तो समाजमाध्यमावर प्रसारित करणाऱ्या तरुणाचा पोलिसांनी भंडाफोड केला. त्या भामट्याविरुद्ध अखेर सिडको पोलिसांनी गुरुवारी रात्री गुन्हा नोंदविला.

आलमगीर कॉलनीतील रहिवासी इम्रान खान रज्जाक खान यास २८ एप्रिलला रात्री साडेअकरा वाजता जळगाव रोडवरील शरद टी पॉइंट येथे अकबर लंगडा (रा. हर्सूल), सद्दाम आणि अन्य एका अनोळखीने मारहाण करून त्याच्या खिशातील १ हजार ७०० रुपये हिसकावून घेतले होते. या घटनेनंतर तो सिडको पोलीस ठाण्यात गेला. त्यानंतर पोलिसांनी त्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात पाठविले. तेथे गेल्यानंतर त्याने मोबाइलवर व्हिडिओ तयार करून समाजमाध्यमावर व्हायरल केला. या व्हिडिओ क्लीपमध्ये इम्रानने सांगितले की, शरद टी पॉइंट येथे त्याला पंधरा जणांनी तलवारीने मारले. जय श्रीराम म्हणत सिडको बसस्थानकापासून त्यांनी पाठलाग केला. या व्हिडिओची गंभीर दखल घेत पोलिसांनी घटनेची शहानिशा केली तेव्हा अशी घटना घडलीच नसल्याचे तपासात समोर आले.

...म्हणून बनवला खोटा व्हिडिओ!त्याच दिवशी पडेगाव येथेही मारहाणीची घटना घडली होती. त्यातील जखमी तरुणांना उपचारासाठी घाटीत आणले असता मोठा जमाव जमला होता. याचवेळी इम्रानही घाटीत उपाचारासाठी दाखल झाला होता. जमावातील चर्चा ऐकून कोणी तरी त्याला ‘जय श्रीराम’ म्हणायला लावून मारहाण झाल्याचा व्हिडिओ तयार करण्याचे सांगितले. त्यानुसार त्याने तसा व्हिडिओ तयार केल्याचे कबूल केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद