शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

‘आरएसएस’सोबत वैचारिक मतभेद कायम : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 00:45 IST

‘आरएसएस’सोबत आमचे वैचारिक मतभेद कायम असले, तरी भाजपसोबत आमची राजकीय मैत्री आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काँग्रेसला साधी आठवणही नव्हती; परंतु जनता दल आणि भाजपच्या राजवटीत बाबासाहेबांची अनेक स्मारके उभारण्यात आली आहेत, असे विचार केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपाइं नेते रामदास आठवले यांनी आज येथे व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘आरएसएस’सोबत आमचे वैचारिक मतभेद कायम असले, तरी भाजपसोबत आमची राजकीय मैत्री आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काँग्रेसला साधी आठवणही नव्हती; परंतु जनता दल आणि भाजपच्या राजवटीत बाबासाहेबांची अनेक स्मारके उभारण्यात आली आहेत, असे विचार केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपाइं नेते रामदास आठवले यांनी आज येथे व्यक्त केले.एका संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त आठवले मंगळवारी औरंगाबादेत आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी बाबासाहेबांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले. सेंट्रल हॉलमध्ये बाबासाहेबांचे तैलचित्र उभारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले. लंडन येथे बाबासाहेबांचे स्मारक केले; परंतु काँग्रेस राज्यकर्त्यांना बाबासाहेबांचा विसर पडला होता. दलित अत्याचाराच्या घटनांकडे त्यांचे लक्ष वेधले असता आठवले म्हणाले, दलितांवर अत्याचार होत आहेत, ही गंभीर बाब आहे. याला ज्या प्रमाणे सरकार जबाबदार आहे, तेवढेच सर्व समाजही जबाबदार आहेत. अत्याचाराचे गुन्हे नोंद करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये स्वतंत्र अधिकारी व कर्मचारी तैनात केले पाहिजेत.सन २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान होतील. त्यामुळे राहुल गांधींचा प्रश्नच येत नाही. सत्ता पाहिजे असेल, तर शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांनी आपसातील वाद मिटवून आगामी निवडणुकांमध्ये युती केली पाहिजे. हे दोघे सोबत येत नसतील, तर रिपाइं भाजपसोबत राहील. कर्नाटक निवडणुकीत रिपाइं १९४ मतदारसंघांत भाजपसोबत आहे.दक्षिण मध्य मुंबई हा लोकसभा मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहे. अगोदर आपण याच मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलो होतो. सेना-भाजप युती झाली, तर आपण या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहोत. युती नाही झाली, तर विदर्भातील रामटेक मतदारसंघातून प्रयत्न करू, असेही रामदास आठवले म्हणाले.यावेळी रिपाइंचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम, मिलिंद शेळके, दौलत खरात, संजय ठोकळ, किशोर थोरात, विजय मगरे, नागराज गायकवाड, बाळकृष्ण इंगळे, अरविंद अवसरमोल, सिद्धार्थ दाभाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.आंबेडकरवादाला नक्षलवाद मान्य नाहीरामदास आठवले म्हणाले, आंबेडकरवाद हा नक्षलवाद मान्य करीत नाही. सच्चा आंबेडकरवादी कार्यकर्ता नक्षलवादी असूच शकत नाही; मात्र बाबासाहेबांचे नाव घेत नक्षलवादी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचीही कमी नाही. पोलिसांनी नक्षलवादी चळवळीच्या नावाखाली आंबेडकरी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करू नयेत.ऐक्याच्या बाजूने सातत्याने मी एकटाच बोलत आहे. ऐक्य झाले तर ते वैचारिक मुद्यांवर व्हावे, भावनिक ऐक्य दीर्घकाळ टिकणारे नाही.एकजातीय ऐक्य राजकीय फायद्याचे नाही. ऐक्यामध्ये सर्वच समाजाचे प्रतिनिधित्व असावे.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेAurangabadऔरंगाबादRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ