शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

थकीत बिलांसाठी कंत्राटदारांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 23:55 IST

औरंगाबाद : थकीत बिलांसाठी मनपातील कंत्राटदारांनी सोमवारपासून मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. दोन दिवसात देयके अदा करण्याची कार्यवाही झाली ...

ठळक मुद्देरोजेदार बांधव : कडक उन्हात मनपासमोर आंदोलन

औरंगाबाद : थकीत बिलांसाठी मनपातील कंत्राटदारांनी सोमवारपासून मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. दोन दिवसात देयके अदा करण्याची कार्यवाही झाली नाहीत तर पाणीपुरवठा, विद्युत आदी अत्यावश्यक कामेही थांबविण्यात येतील, असा इशारा कंत्राटदारांनी दिला आहे. उपोषणात अनेक रोजेदार बांधवांचाही समावेश आहे.महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा सर्वाधिक फटका विकासकामे करणाऱ्या कंत्राटदारांना बसला आहे. तिजोरीत सध्या खडखडाट असल्यामुळे ठेकेदारांची जवळपास ३०० कोटी रुपयांची बिले थकली आहेत. त्यामुळे कंत्राटदार आर्थिक संकटात सापडले आहेत. उधारीवर साहित्य आणून कंत्राटदारांनी विकासकामे केली आहेत. थकीत बिले मिळावीत यासाठी एक वर्षापासून कंत्राटदार पाठपुरावा करीत आहेत. तिजोरीत पैसे नसल्यामुळे कंत्राटदारांच्या पदरी केवळ आश्वासने पडत आहेत. कंत्राटदारांनी आयुक्त, महापौरांना घेराव, मनपा मुख्यालयासमोर निदर्शने, उपोषण अशा प्रकारे अनेक वेळा आंदोलने केली. तरीही बिले न मिळाल्याने ठेकेदार आक्रमक झाले आहेत. सोमवारपासून या ठेकेदारांनी पालिका मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. परंतु पहिल्या दिवशी प्रशासनाने या आंदोलनाची कोणतीही दखल घेतली नाही. मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक हे सोमवारी मनपा मुख्यालयात आले; परंतु त्यांनी ठेकेदारांची भेट घेतली नाही. त्यामुळे ठेकेदार आणखी संतप्त झाले आहेत. आता दोन दिवसांत बिले मिळाली नाही तर विद्युत आणि पाणीपुरवठ्यासारखी अत्यावश्यक कामेही बंद करण्यात येतील, असा इशारा ठेकेदारांनी दिला आहे.विकासकामे ठप्पथकीत बिले मिळत नसल्यामुळे बहुसंख्य कंत्राटदारांनी पालिकेच्या कामांवर याआधीच अघोषित बहिष्कार टाकला आहे. विकासकामांच्या वारंवार निविदा मागवूनही ठेकेदार पुढे येण्यास तयार नाहीत. त्यामुळे किती तरी विकासकामे रखडली आहेत. आतापर्यंत विद्युत आणि पाणीपुरवठ्यासारखी अत्यावश्यक कामे सुरू आहेत. मात्र, आता तीही बंद करण्याचा इशारा ठेकेदारांनी दिला आहे.आयुक्तांचे खाजगीत फोनवॉर्डांमधील विकासकामे ठप्प झाल्याने नगरसेवक थेट आयुक्तांकडे कामांसाठी तगादा लावत आहेत. आयुक्त ज्या कंत्राटदारांनी कामे घेतली आहेत, त्यांना काम सुरू करा म्हणून खाजगीत फोन करीत आहेत. कंत्राटदारांना २ लाख रुपये देतो, काम करा असे आश्वासन देत आहेत. यानंतरही कंत्राटदार काम करण्यास तयार नाहीत.-----------------

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका