शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

बीडबायपास रस्ता, जलवाहिनी, पुलाचे काम केलेल्या ठेकेदाराची ६९ लाखांची फसवणूक

By सुमित डोळे | Updated: March 6, 2025 19:31 IST

मुंबईच्या कृ़पाय इंडस्ट्रिज च्या चार संचालकांवर गुन्हा दाखल, आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग

छत्रपती संभाजीनगर : बीडबायपासच्या संपूर्ण कामाचा ठेका घेतलेल्या जीएनआय इंफ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीची ६९ लाख ७२ हजारांची फसवणूक झाली. याप्रकरणी मुंबईच्या कृ़पाय इंडस्ट्रिजच्या पायल दर्शन शाह, प्रदिप रजनिकांत शाह, रमिला प्रदिप शाह व दर्शन शहा (रा. मुंबई) या संचालकांवर सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविंदरसिंग बिंद्रा (४६, रा. ज्योतीनगर ) यांच्यासह त्यांचे वडिल व काका जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे संचालक आहेत. त्यांचे नातेवाईक व मंजित कॉटनचे संचालक राजेंद्रसिंग यांच्यासोबतच्या भागिदारीत एमसीजीएन रोडवेज एलएलपी ही फर्म स्थापन केली आहे. या फर्मद्वारे त्यांनी काही वर्षांपूर्वी झाल्टा फाटा ते महानुभव आश्रम रस्ता बांधणे, त्यावरील पुल व जलवाहिनी टाकण्याचे काम त्यांना मिळाले हाेते. त्यासाठी आवश्यक २२०० मिटर एम.एस. वेल्डेट पाईपसाठी त्यांनी १७,१०० रुपये प्रती मिटरप्रमाणे कृपाय इंडस्ट्रिज कंपनीला काम दिले होते. २० टक्के अॅडव्हॉन्स प्रमाणे बिंद्रा यांनी ३२ लाख २८ हजार रुपये पाठवल्यानंतर पुरवठा सुरू झाला. विश्वास बसल्याने त्यांनी आणखी ११ लाख ८० हजार रुपये आरोपी कंपनीला अदा केले. त्यानंतर आणखी १६०० मिटर चे पाईप पाठवण्यास सांगितले. ९ फेब्रुवारी, २़०२३ पर्यंत बिंद्रा यांनी आरोपींना ३ कोटी ५९ लाख ५७ हजार रुपये पाठवले. त्यापैकी २ कोटी ६४ लाख़ १२ हजारांचे एकूण १३०८ पाईपचा त्यांनी पुरवठा केला होता.

उडवाउडीवीचे उत्तरे, खर्चही वाढवलाशाह यांनी फेब्रुवारी, २०२३ नंतर पुरवठा करणे बंद केले. ७५ टक्के आगाऊ रक्कमेची मागणी केली. बिंद्रा यांनी त्यांना त्यांच्याकडेच जमा रक्कमेबाबत सांगितले. तरीही दर्शनने वडिल आजारी असल्याचे कारण सांगितले. १५ मे ते ९ ऑगस्ट, २०२३ दरम्यान त्याने कच्चा मालाचा पुरवठा केला. मात्र, तोही दामदुप्पट दराने पुरवून २४ लाख ६८ हजार रुपये खर्च दाखवला. वारंवार मागणी करुन त्याने मार्च, २०२४ मध्ये २ लाख रुपये पाठवले. मात्र, जलवाहिण्यांचा पुरवठा नकार देत ६९ लाख ७२ हजार रुपये बुडवले. वर काॅल न करण्यासाठी धमकी देखील दिली. निरीक्षक संग्राम ताठे यांनी गुन्हा दाखल करुन आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग केला.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी