शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

सुपारी होती पाय तोडायची, मात्र आरोपींनी घेतला जीवच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 18:27 IST

हॉटेल व्यावसायिक शेरखान यांच्यावर लोखंडी पाईपने हल्ला करणार्‍या मुख्य आरोपीला बेड्या ठोकण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना रविवारी रात्री यश आले.

औरंगाबाद : हॉटेल व्यावसायिक शेरखान यांच्यावर लोखंडी पाईपने हल्ला करणार्‍या मुख्य आरोपीला बेड्या ठोकण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना रविवारी रात्री यश आले. मुख्य आरोपीने पाय तोडायची सुपारी दिली होती मात्र आरोपींनी शेरखान यांचा जीवच घेतल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. 

शेख सरताज शेख नासेर ऊर्फ अज्जीदादा (२५, रा. युनूस कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. शेरखान यांच्या खूनप्रकरणी आतापर्यंत अटक झालेल्या आरोपींची संख्या ९ झाली आहे. याप्रकरणी मुन्ना बोचरा हा पसार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. गुन्हे शाखा पोलिसांनी सांगितले की, छावणी परिसरातील रहिवासी, हॉटेल व्यावसायिक शेरखान यांच्यावर लोखंडी पाईपने हल्ला करून त्यांचा खून करण्यात आला होता. २७ डिसेंबरच्या रात्री झालेल्या या खुनाचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस करीत आहेत. पूर्व वैमनस्यातून आणि प्लॉटिंगच्या वादातून शेरखान यांची सुपारी देऊन हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

सुपारी देणार्‍या अक्रम खानसह आरोपी शेख अश्फाक, आकाश पडूळ ऊर्फ शेरा यांना २ मार्च रोजी पोलिसांनी अटक केली. या आरोपींचे पसार असलेले साथीदार शेख सरताज आणि मुन्ना बोचरा यांचा शोध पोलीस घेत होते. रविवारी रात्री सरताज हा घरी आल्याची माहिती खबर्‍याने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे, उपनिरीक्षक विजय जाधव, सहायक उपनिरीक्षक नसीम खान, कर्मचारी सुरेश काळवणे, समद पठाण, रमेश भालेराव, प्रदीप शिंदे, भाऊसिंग चव्हाण, संदीप बीडकर यांनी रात्रीच आरोपीच्या घरावर धाड मारून त्यास पकडले. सरताज आणि अन्य आरोपींनी शेरखान यांच्यावर पाळत ठेवून त्यांचा खून केला होता. शेरखान हे वादग्रस्त प्लॉटस् आणि जमीन खरेदी-विक्र ी आणि हॉटेलचा व्यवसाय करीत. जमीन व्यवहारात त्यांचे अनेकांशी वाद झाले होते. शिवाय शेरखान याच्या विरोधातही विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे पोलिसांत दाखल होते. 

आणखी एकास पोलीस कोठडीछावणीतील शेरखान यांच्या खून खटल्यात पोलिसांनी अटक केलेला आणखी एक आरोपी शेख सरताज ऊर्फ अज्जीदादा शेख नसीर (२५), रा. युनूस कॉलनी, कटकटगेट याला ८ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश  प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सोमवारी (दि.५ मार्च) दिले.दरम्यान, रविवारी अटक केलेल्या तीन आरोपींना न्यायालयाने ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली. अक्रमखान गयाज खान (२७, रा. जटवाडा), शेख अश्फाक शेख इसाक (२५, रा. शहाबाजार) आणि आकाश पडूळ ऊर्फ शेर्‍या (२२, रा. जिन्सी परिसर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

पाय तोडायचे आदेश... आरोपींनी घेतला जीवच...तपास अधिकार्‍यांनी सांगितले की, शेरखान हे कोणत्याही व्यवहारात आडवे येत असल्याने अक्रम खान गयाज खान याने अन्य आरोपींना त्यांचे पाय तोडण्याची सुपारी दिली होती. मात्र आरोपींनी त्यांचे पाय तोडण्याऐवजी त्यांच्या डोक्यावर लोखंडी पाईपने हल्ला करून त्यांचा खूनच केल्याचे तपासात समोर आले.