शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

लातुरात लवकरच अतिरिक्त एमआयडीसी- २ ची उभारणी: उदय सामंत

By हरी मोकाशे | Updated: October 13, 2023 19:30 IST

उदगीरच्या एमआयडीसीला तत्वत: मंजुरी

लातूर : नवनवीन उद्याेग उभारणीबरोबरच हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी लातुरात लवकरच अतिरिक्त एमआयडीसी- २ ची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी ४८२ हेक्टर जागेची आवश्यकता असून शेतकऱ्यांना सोबत घेऊन भूसंपादन करावे, अशा सूचना केल्या असल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवार पत्रपरिषदेत दिली. शिवाय, उदगीरातही एमआयडीसी उभारण्यास तत्त्वत: मंजुरी दिल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आ. बाबासाहेब पाटील, माजी आ. गोविंद केंद्रे, अनिल भंडारी, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे, जि.प.चे सीईओ अनमोल सागर आदींची उपस्थिती होती. उद्योगमंत्री सामंत म्हणाले, चाकुरात २६६ हेक्टरवरील एमआयडीसी प्रक्रिया सुरु असून जळकोटात मिनी एमआयडीसी उभारण्यास तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे. लातूर, औसा, अहमदपूर येथील ४३ कोटींची सात कामे मंजूर करण्यात आली असून लवकरच निविदा निघून कामे सुरु होतील.

जलवाहिनीसाठी निधी देण्याचा निर्णय...एमआयडीसीला पाणीपुरवठ्यासाठी ३६ एमएलडीची जलवाहिनी असली तरी प्रत्यक्षात ५ एमएलडी पाणी मिळते. ही जलवाहिनी जुनी जीर्ण झाल्याने त्यासाठी आणि विद्युतसाठी एमआयडीसीतून निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिनाभरात त्याची अंमलबजावणी होईल. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून ३५० प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे.

बारा बलुतेदारांसाठी विश्वकर्मा...केंद्र शासनाच्या वतीने बारा बलुतेदार आणि १८ घटकांसाठी विश्वकर्मा योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी राज्यास ५०० कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. योजनेतून प्रशिक्षण, आधुनिक यंत्रे देण्यात येणार आहेत. कदाचित त्याची सुरुवात लातूरपासून सुरु होईल, असेही सामंत म्हणाले.

विमानतळासाठी ३८ हेक्टर जमीन संपादित...लातूरच्या विमानतळासाठी ४८ हेक्टर जमिनीची आवश्यकता असून सध्या ३८ हेक्टर जमीन एमआयडीसीने ताब्यात घेतली आहे. आणखीन १० हेक्टर जमीनीची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांशी चर्चा करुन ती घेण्यात येईल. हे विमानतळ खाजगी कंपनीस देण्यात आले होते. ते एमआयडीसी आणि विमान प्राधिकरणकडे देण्यासाठी आपला प्रयत्न सुरु आहे. अगदी विमान पार्किंगमधूनही कोट्यवधीचे उत्पन्न होईल.

संजय बनसोडे सल्लागार पालकमंत्री...आमचे हे सरकार तीन पक्षांचे आहे. त्यामुळे काही राजकीय तडजोड करावी लागते. मी रत्नागिरीतून निवडून येऊनही सिंधुदुर्गचा पालकमंत्री होतो. तसेच सध्याचेही लातूरचे आहे. लातूरचे पालकमंत्री हे मंत्री संजय बनसोडे यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेत असतात. त्यामुळे ते सल्लागार पालकमंत्री आहेत, असेही उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले.

टॅग्स :laturलातूरMIDCएमआयडीसी