शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

नशेच्या सवयीने बांधकाम मजूर बनला दुचाकी चोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 19:02 IST

व्यसन भागविण्यासाठी त्याने वाहनचोरीचा उद्योग सुरू केल्याचे पोलीस तपासात समोर आले.

औरंगाबाद: नशापाणी करण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या भागातून  मोटारसायकली पळविणाऱ्या चोरट्याला मुकुंदवाडी पोलिसांनी मोठ्या शिताफीने रविवारी (दि.१० ) रात्री अटक केली.  त्याच्याकडून चोरीच्या तीन मोटारसायकली हस्तगत केल्या.  या चोरट्याकडून वाहनचोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

रोहित दत्तू अंभोरे (२०,रा. मुकुंदनगर, मुकुंदवाडी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. याविषयी पोलिसांनी सांगितले की, स्वराजनगर येथील अमोल तोताराम बडक यांची मोटारसायकल चोरट्यांनी ९ रोजी रात्री चोरून नेली होती. याविषयी बडक यांनी मुकुंदवाडी ठाण्यात तक्रार नोंदविली होती. पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक राहुल बांगर, कर्मचारी कौतीक गोरे, कैलास काकड, असलम शेख,  सुनील पवार, मनोहर गिते, विजय चौधरी, प्रकाश सोनवणे, संतोष भानुसे, सुधाकर पाटील यांनी तपास सुरू केला तेव्हा ११ रोजी रात्री संशयित तरूण दुचाकीवर बसून जाताना दिसला.

पोलिसांनी त्यास थांबवून त्याच्याकडील दुचाकीच्या मालकीसंबंधी कागदपत्रे सादर करण्याचे सांगितले. तेव्हा तो उडवा,उडवीची उत्तरे देवू लागला. यानंतर त्याला पोलीस ठाण्यात नेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याजवळील मोटारसायकल ९ रोजी रात्री त्याने स्वराजनगरातून चोरल्याची कबुली दिली. त्याने वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन मोटारसायकली चोरल्याचे सांगून लपवून ठेवल्याचे सांगितले.  त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे त्याने लपवून ठेवलेल्या ठिकाणाहून पोलिसांनी आणखी दोन मोटारसायकली (क्रमांक एमएच-२०झेड ४९७२) आणि क्रमांक(एमएच२१- एच ६६०६)जप्त केल्या. आरोपीकडून मोटारसायकल चोरीची आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता त्यांनी वर्तविली.

आरोपीस नशा करण्याची सवय आरोपी रोहित अंभोरे हा नशापाणी करण्याच्या सवयीचा आहे. तो बांधकाम मजूर म्हणून काम करतो. असे असले तरी व्यसन भागविण्यासाठी त्याने वाहनचोरीचा उद्योग सुरू केल्याचे पोलीस तपासात समोर आले. मारहाणीच्या गुन्ह्यात आरोपीला काही दिवसापूर्वी पोलिसांनी अटक केली होती. मात्र वाहनचोर म्हणून तो प्रथमच पोलिसांच्या रेकॉर्डवर आला.

टॅग्स :theftचोरीAurangabadऔरंगाबादArrestअटकPoliceपोलिस