शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

संविधान हाच आमचा चेहरा; हाच चेहरा घेऊन आगामी निवडणुका लढवू : कन्हैयाकुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 19:42 IST

संविधान हाच आमचा चेहरा असून, हाच चेहरा घेऊन आम्ही आगामी निवडणुका लढवू

ठळक मुद्दे- औरंगाबादहून दिल्लीला रवाना होण्यापूर्वी बातचीत

औरंगाबाद : संविधान हाच आमचा चेहरा असून, हाच चेहरा घेऊन आम्ही आगामी निवडणुका लढवून भाजपसारख्या मनुवादी पक्षाला हरवणार असल्याचा विश्वास भाकपच्या राष्ट्रीय कौन्सिलचे सदस्य व लोकप्रिय युवक नेते कन्हैयाकुमार यांनी व्यक्त केला. ते रविवारी औरंगाबादहून दिल्लीला रवाना होण्यापूर्वी पत्रकारांशी बातचीत करत होते. 

२४ आॅगस्टपासून मराठवाड्यात विविधजाहीर सभांना संबोधित करून दुपारी कन्हैयाकुमार औरंगाबादेत आले होते. एका हॉटेलमध्ये जुने कम्युनिस्ट कार्यकर्ते जयमलसिंग रंधवा यांनी स्वागत केले व तेथेच कन्हैयाकुमार यांनी दिल्लीला जाण्यापूर्वी पत्रकारांशी बातचीत केली. पंतप्रधान निवडणे म्हणजे वर्गाचा मॉनिटर निवडण्यासारखे नाही. त्यामुळे चेहऱ्याच्या राजकारणावर आमचा विश्वास नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

आरक्षणाच्या मुद्यावर कन्हैयाकुमार म्हणाले की, पाच हजार वर्षांपासून आर्थिक निकषावरच आरक्षण चालू आहे. अंबानीच्या मुलाला त्याच्या संपत्तीसाठी वेगळा अर्ज थोडाच करावा लागतो, ती संपत्ती दुसऱ्याला थोडीच मिळते, ती त्यालाच मिळते. हे आरक्षणच आहे. बीपीएलसाठी रेशन दिले जाते, हेही एक प्रकारचे आरक्षणच आहे. यावेळी डॉ. भालचंद्र कानगो, राम बाहेती, अभय टाकसाळ, अश्फाक सलामी आदींची उपस्थिती होती. 

प्रधानमंत्री नव्हे, तर प्रचारमंत्री..               नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री नव्हे, तर प्रचारमंत्री आहेत, या आरोपाचा त्यांनी आज पुनरुच्चार केला. यासंदर्भात त्यांनी सांगितले की, ते पूर्णवेळ प्रचारमंत्री आहेत. देश-विदेशात जाऊनही ते प्रचाराचे काम चालूच ठेवतात. कुठल्याही योजना जमिनीशी जोडल्या गेलेल्या असाव्यात आणि त्याचे केवळ श्रेयासाठी मार्केटिंगही व्हायला नको; पण मोदी सतत मार्केटिंगमध्येच व्यस्त असतात; पण दुसरीकडे संविधानावर हल्ला होत असताना, ते जाळले असताना ते ब्र सुद्धा काढत नाहीत. उलट संविधानाची बाजू मांडणाऱ्यांना चूप केले जात आहे आणि संविधान जाळणाऱ्यांना संरक्षण दिले जात आहे. आज देशात गरीब- श्रीमंत ही दरी वाढत आहे. श्रीमंत श्रीमंतच होत चालला आहे. यावर मोदी कधी काही बोलत नाहीत. 

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद