पैठणकरांना दिलासा; नियम व अटीसह विविध दुकाने सुरु करण्यास परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 07:46 PM2020-05-18T19:46:42+5:302020-05-18T19:49:18+5:30

पैठण शहरातील विविध क्षेत्रातील व्यापारी अस्थापना सुरू करण्या बाबत तहसील, पोलीस व नगर परिषद प्रशासनाची आज बैठक झाली.

Consolation to Paithankars; Permission to start various shops with terms and conditions | पैठणकरांना दिलासा; नियम व अटीसह विविध दुकाने सुरु करण्यास परवानगी

पैठणकरांना दिलासा; नियम व अटीसह विविध दुकाने सुरु करण्यास परवानगी

googlenewsNext
ठळक मुद्देही सर्व दुकाने शुक्रवारी बंद राहणार दुकानाची वेळ सकाळी ७ ते १२ अशीच असेल

पैठण : शहरात विविध प्रकारची दुकाने सोशल डिस्टन्सिंगचे नियम व अटी पाळून निर्धारीत वेळेत सुरू ठेवण्यास प्रशासनाने आज पासून परवानगी दिली आहे. मात्र, कोरोना संसर्गास कारणीभूत ठरतील अशा दारू, तंबाखू व सलूनच्या दुकानावरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे. विविध दुकाने सुरू होणार असल्याने शहरातील व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, जे दुकानदार  नियमाचे पालन करणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा ईशारा मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी दिला आहे.

पैठण शहरातील विविध क्षेत्रातील व्यापारी अस्थापना सुरू करण्या बाबत तहसील, पोलीस व नगर परिषद प्रशासनाची आज बैठक झाली. बैठकीसाठी तहसीलदार चंद्रकांत शेळके, पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख व नगर परिषद मुख्याधिकारी सोमनाथ जाधव आदी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत दर शुक्रवारी संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील कोणत्या दुकाना कोणत्या वारास सुरू राहतील या बाबत पुढील निर्णय घेण्यात आला.

सोमवार व मंगळवार - 
रेडिमेड, कापड दुकान, टेलर, फूट वेअर, वॉच, लॉंड्री.

बुधवार व गुरूवार - 
ईलेक्ट्राँनिक, ईलेक्ट्रीकल, मोबाईल, चष्मा, स्टेशनरी, टेलरिंग मटेरियल, बुक स्टॉल, लेडीज शॉपी, कॉस्मेटिक, फर्निचर, झेरॉक्स, फोटो स्टुडिओ, अगरबत्ती व कलर दुकाने सुरू राहतील.

शनिवार व रविवार - 
सोनार, ज्वेलर्स, भांडे, आतार, मनियार, बांगडी, सायकल, फरसान, मिठाई, 

सोमवार ते रविवार ---
हार्ड वेअर, गँरेज, अँटोमोबाईल, बांधकाम मटेरियल, पंम्चर दुकाने, कुशन, डिजिटल फ्लेक्स, भाजीपाला, बेकरी, फळे, फुलाचे दुकान, चिकन,  मटन, मासे, दूध, किराणा अशा सर्व दुकाना सुरू राहणार आहेत.

दरम्यान, ही सर्व दुकाने शुक्रवारी बंद राहणार असून दुकानाची वेळ सकाळी ७ ते १२ अशीच राहणार आहे. कृषी सेवा दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उघडी ठेवता येणार आहेत. सर्व दुकानदारांनी सोशल डिस्टन्सिंग नियम पाळून व्यापार करावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Consolation to Paithankars; Permission to start various shops with terms and conditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.