शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले...
2
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘मोदी चांगले मित्र आहेत’; बाजूलाच उभे असलेले पाकिस्तानचे शाहबाज शरीफ अवाक, व्हिडीओ व्हायरल
3
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
4
१ नोव्हेंबरपासून करू शकणार २३९० रुपयांत हवाई प्रवास, या दिग्गज कंपनीनं केली मोठी घोषणा
5
आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन"
6
राष्ट्रीय महामार्गावरील अस्वच्छ शौचालयाचा फोटो पाठवा, Fastag मध्ये ₹१००० रुपये मिळवा; काय आहे हा प्रकार?
7
५०० वर्षांनी हंस केंद्र त्रिकोण राजयोग: ९ राशींना बोनस, अकल्पनीय लाभ; भाग्योदय-पैसा-भरभराट!
8
लोकल लेट झाल्याने बदलापूर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी; गर्दी आवरण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल स्थानकात
9
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
10
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
11
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
12
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
13
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
14
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
15
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
16
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
17
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
18
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
19
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
20
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 

औरंगाबादच्या कनेक्टिव्हिटीत भर; बंगळुरू विमानसेवेला मिळाला उत्तम प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 12:15 IST

बंगळुरूसह दिल्लीसाठी नव्या विमानाचे ‘उड्डाण’

ठळक मुद्दे पहिल्या विमानात ७१ प्रवासी  

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्ली, हैदराबादसाठी विमानसेवा सुरू केल्यानंतर स्पाईस जेटने सोमवारी (दि.२५) बंगळुरू-औरंगाबाद-बंगळुरू विमान सुरू करून शहराच्या कनेक्टिव्हिटीत भर टाकली. 

बंगळुरूहून ७१ प्रवाशांना घेऊन स्पाईस जेटचे विमान औरंगाबादेत दाखल झाले. यावेळी विमानतळ प्राधिकरणातर्फे वैमानिकांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे, औरंगाबाद क्लॉथ मर्चंटचे अध्यक्ष विनोद लोया, डॉ. विनोद तोतला, डॉ. शिल्पा तोतला, आनंद अग्रवाल, स्पाईस जेटचे स्टेशन मॅनेजर आर. एच. मुजावर, मनोज गुप्ता आदींसह विमानतळावरील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. दुपारी १२.२० वाजता या विमानाने बंगळुरूसाठी उड्डाण घेतले. औरंगाबादहून ४० प्रवासी रवाना झाल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाच्या अधिका-यांनी दिली.

हैदराबादपाठोपाठ आता बंगळुरू विमानसेवेद्वारे औरंगाबाद शहराची दक्षिण भारताबरोबरची हवाई कनेक्टिव्हिटी वाढली आहे. दक्षिण भारतातून धार्मिक आणि पर्यटनस्थळांना भेट देणाºयांची मोठी संख्या आहे. या विमानसेवेच्या माध्यमातून पर्यटनालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. स्पाईस जेटने ९० आसन क्षमतेच्या बम्बार्डियर विमानाद्वारे ही सेवा सुरू केली आहे. उद्योजक सुनीत कोठारी म्हणाले, बंगळुरू साठी सुरू केलेल्या विमानाला प्रवाशांनी पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद दिला. या विमानसेवेची अनेक दिवसांपासून मागणी होत होती. त्यासाठी पाठपुरावा केला आणि अखेर ही सेवा सुरू झाली. दिल्लीसाठीही आणखी एक विमान सुरू केले. मुंबईसाठी विमान सुरू होण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. शिर्डी विमानतळावरील विमाने सध्या औरंगाबादहून उड्डाण घेत आहेत. या सगळ्यात पहिल्याच दिवशी ४० प्रवासी बंगळुरूला रवाना झाले.

दीडशे प्रवासी दिल्लीला रवाना८ आॅक्टोबर रोजी स्पाईस जेटच्या दिल्ली-औरंगाबाद-दिल्ली विमानसेवेला सुरुवात केली. अवघ्या काही दिवसांतच या विमानसेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या मार्गावर मोठे विमान सुरू केले. प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद पाहता या कंपनीने बंगळुरूबरोबर सोमवारी दिल्लीसाठी आणखी एक विमान सुरू केले. या विमानाने पहिल्याच दिवशी जवळपास शंभर प्रवासी औरंगाबादेत आले आणि दीडशे प्रवासी दिल्लीला रवाना झाल्याची माहिती विमानतळाच्या अधिका-यांनी दिली.

मुंबई विमानाकडे लक्षऔरंगाबादहून मुंबईसाठी नवीन विमान सुरू होण्याची प्रतीक्षा केली जात आहे. त्यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्न केला जात आहे. ‘इंडिगो’च्या माध्यमातून ही विमानसेवा उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळtourismपर्यटनspicejetस्पाइस जेटBengaluruबेंगळूरAurangabadऔरंगाबाद