जालना : लोकसभा, विधानसभा निवडणूकीत नागरिकांना खोटी आश्वासने देवून नागरिकांची मते मिळवून सत्तेवर आलेल्या भाजपा - शिवसेना सरकारच्या विरोधात ९ फेबु्रवारी रोजी रास्ता रोको करण्याचा निर्णय गुरूवारी झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला.जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे होते. यावेळी जिल्हा प्रभारी अरूण मुगदिया, माजी आमदार कैलास गोरंट्याल, महिला जिल्हाध्यक्षा विमलताई आगलावे, सेवादल जिल्हाध्यक्ष प्रशांत वाढेकर, सुभाष काटकर, वसंत डोंगरे, संदीप कड, विष्णू कंटूले, एकबाल कुरेशी, अंकुश राऊत, जगदीश येनगुपटला, श्रीकिसन देठे, राम सावंत, माऊली डूकरे, सुरेश वाकडे, राजेश राठोड आदींची उपस्थिती होती.यावेळी अरूण मुगदिया म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारने शेतकरी विरोधी जो भूमि अभीलेख कायदा आहे, त्यात बदल करू नये, पॅकेजच्या नावाखाली सरकाने तुटपुंजी मदन देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे. याचा काँग्रेस कमिटीतर्फे निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी मतदारांन खोटी स्वप्न दाखवून मते मांगणाऱ्या या खोटारड्या सरकारचा निषेध केला. आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी होणाऱ्या या रास्तोरोको आदोलनात सर्वसामान्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी शीतल तनपुरे, लता डोंगरे, अशोक उबाळे, हरीभाऊ चव्हाण, समाधान वाघ, सय्यद गणी, मंजीत टकले, कृष्णा पडूळ आदी उपस्थित होते.
सरकारच्या धोरणांविरुद्ध काँग्रेस उतरणार रस्त्यावर
By admin | Updated: February 6, 2015 00:55 IST