शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्हा परिषदेत काँग्रेस-सेनेत जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 12:44 IST

चालू आर्थिक वर्षात प्राप्त निधीचे सर्व सदस्यांना समन्यायी वाटप केले जावे, या मुद्यावरून जिल्हा परिषदेत सत्ताधारी आघाडीतील काँग्रेस-सेनेत जुंपली आहे.

औरंगाबाद : चालू आर्थिक वर्षात प्राप्त निधीचे सर्व सदस्यांना समन्यायी वाटप केले जावे, या मुद्यावरून जिल्हा परिषदेत सत्ताधारी आघाडीतील काँग्रेस-सेनेत जुंपली आहे. बांधकाम व सिंचन विभागांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, त्याचे नियोजन अवघ्या दोनच तालुक्यांसाठी केल्यामुळे काँग्रेसने यासंदर्भात अधिकाऱ्यांना जाब विचारला. 

जिल्हा परिषदेत काँग्रेस व सेनेची आघाडी आहे; मात्र मागील वर्षापासून निधी वाटपामध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून काँग्रेस व भाजपला डावलण्यात येत आहे. चालू आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीकडून इतर जिल्हा मार्ग मजबुतीकरणासाठी (५०५४ लेखाशीर्ष अंतर्गत) २७ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. किमान यंदा तरी जिल्हा परिषदेतील सर्वपक्षीय सदस्यांना निधीचे समान वाटप व्हावे, ज्यामुळे सदस्यांना सर्कलमध्ये विकासकामांना न्याय देता येईल, अशी भूमिका काँग्रेसचे जि.प. सदस्य तथा उपाध्यक्ष केशव तायडे यांनी घेतली आहे. यासंदर्भात त्यांनी आज अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांना पत्र दिले. 

तथापि, जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांचे म्हणणे आहे की, निधीच्या नियोजनासाठी जिल्हा परिषदेतील काँग्रेस, भाजप, शिवसेना व अन्य पक्षांच्या गटनेत्यांकडून त्यांच्या पक्षाच्या सदस्यांच्या यादीची सातत्याने मागणी करण्यात आली. काँग्रेसने अद्यापही त्यांच्या सदस्यांची यादी दिलेली नाही. यापूर्वी उपाध्यक्ष केशव तायडे व काँग्रेसच्या सदस्यांसोबत निधीच्या नियोजनाबाबत चर्चा झाली. सर्वपक्षीय सदस्यांना निधी मिळेल, या हिशेबाने काँग्रेसला निधी देण्याचे ठरले; परंतु अलीकडे त्यांनी ठरलेल्या वाट्यामध्ये आणखी वाढ सुचविली आहे. काँग्रेसच्या मागणीनुसार निधी देऊन जमणार नाही. आम्हाला अन्य पक्षांच्या सदस्यांचाही विचार करावा लागेल, असे अध्यक्षा म्हणाल्या. 

निधीची पळवापळवीजिल्हा परिषदेतील काँग्रेस व भाजप सदस्यांचे म्हणणे आहे की, जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीचे अद्याप नियोजन झालेले नसल्यामुळे किमान सर्व सदस्यांना समन्यायी वाटप झाले पाहिजे, अशी मागणी रेटण्यात आली आहे; परंतु जिल्हा परिषदेच्या उपकराच्या निधीचे पैठण व गंगापूर या दोनच तालुक्यांत नियोजन करण्यात आले. प्रशासकीय मान्यताही काढण्यात आल्या आहेत. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष घालणे गरजेचे होते. दरम्यान, निधीच्या नियोजनावरून सध्या जिल्हा परिषदेत सर्वच पक्षांच्या सदस्यांमध्ये मोठी खदखद दिसून येत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदfundsनिधीShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस