शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला घरघर; निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या नेत्यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाजपत

By विकास राऊत | Updated: August 4, 2022 19:38 IST

येत्या निवडणुकीत भाजप मागील उणीव भरून काढत जि.प. ताब्यात घेईल; आमदार बागडे यांचा विश्वास

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसला घरघर लागली आहे. फुलंब्री मतदारसंघातील करमाड गटातून निवडून येत ईश्वर चिठ्ठीच्या आधारे जि.प.अध्यक्ष झालेल्या मीना शेळके व त्यांचे पती काँग्रेस तालुका अध्यक्ष रामूकाका शेळके यांनी गुरुवारी आ.हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. उस्मानपुरा येथील भाजप कार्यालयात हा प्रवेशाचा सोपस्कार पार पडला.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांना हा मोठा धक्का मानला जात असून काँग्रेसमधील सासुरवासाला कंटाळून पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे शेळके दाम्पत्याने पत्रकारांशी बोलताना सांगितले. काँग्रेसमध्ये असलेले दोन गट, चुकीचे आरोप करणे, आम्हाला वारंवार डावलणे यासारखे प्रकार मनाला पटले नाहीत. कुठलीही अट न ठेवता भाजपत प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.

आ.बागडे म्हणाले, गेल्या पंचवार्षिकमध्ये भाजपचे २३ जि.प.सदस्य होते. अध्यक्षपदापर्यंत जाण्याची भाजपची तयारी होती. परंतु काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीमुळे अध्यक्षपद मिळाले नाही. येत्या निवडणुकीत भाजप मागील उणीव भरून काढत जि.प. ताब्यात घेईल.

यावेळी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष पुष्पा काळे, माजी जि.प.सभापती अनुराधा चव्हाण, तालुका अध्यक्ष श्रीराम शेळके, कृउबा माजी सभापती राधाकिसन पठाडे, दामोदर नवपुते, राजू शिंदे, दत्ताभाऊ उकर्डे, सजनराव मते, प्रकाश काकडे, अशोक साळुंके, अशोक पवार, पं. स. माजी सभापती सरसाबाई वाघ, सजन बागल आदींची उपस्थिती होती.

इतर नेत्यांना काही माहिती नाहीभाजपाच्या इतर नेत्यांना या प्रवेशाबाबत काहीही माहिती नव्हते. प्रदेश सरचिटणीस आ.अतुल सावे यांच्यासह शहर जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांना देखील असा काही प्रवेश होणार असल्याची साधी माहिती देखील देण्यात आली नव्हती. केणेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी मुंबईत आहे, मला याबाबत काही माहिती नाही.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद