शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

काँग्रेसची भाजपवर कुरघोडी; बाजार समितीत अशासकीय प्रशासक मंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 13:47 IST

BJP Vs Congress : अनेक दिवसांच्या आपल्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे म्हणाले

ठळक मुद्देजगन्नाथ काळे औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासकपदी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे प्रत्येकी चार प्रशासक

औरंगाबाद : औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेस आणि भाजपमध्ये कुरघोडीचे राजकारण अद्याप सुरूच असून, गुरुवारी शासनाने अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त केले. जगन्नाथ काळे यांची या मंडळावर मुख्य प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.जगन्नाथ काळे हे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांचे बंधू असून, ते व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आहेत, तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवडून आलेले आहेत. ( Non-Governmental Board of Governors in the Aurangabad Market Committee )

अनेक दिवसांच्या आपल्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे म्हणाले, तर शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सारे प्रशासक एकदिलाने काम करू, असा विश्वास नवनियुक्त मुख्य प्रशासक जगन्नाथ काळे यांनी व्यक्त केला. प्रशासक मंडळ नेमू नये. नेमायचेच झाल्यास लोकनियुक्त संचालक मंडळास नेमावे, अशी मागणी करणारी आमची याचिका न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणीस येत आहे. त्याआधीच डॉ. कल्याण काळे यांनी घाई करून या प्रशासक मंडळाची नियुक्ती करून घेतली. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया माजी सभापती राधाकिशन पठाडे यांनी व्यक्त केली. पठाडे हे आ. हरिभाऊ बागडे यांचे समर्थक आहेत. कोरोनामुळे मुदतवाढ न दिल्याचे प्रकरणही पठाडे यांनी न्यायालयात नेले होते. शासनाचे कार्यासन अधिकारी जयंत भोईर यांच्या सहीचे पत्र जिल्हा उपिनबंधकांमार्फत प्राप्त होताच नव्या प्रशासक मंडळाने तातडीने सायंकाळीच आपला पदभार स्वीकारला.

...असे आहे प्रशासक मंडळमुख्य प्रशासक-जगन्नाथ काळे, सर्जेराव चव्हाण, शिवाजी ढाकणे, शेख मो. चांद ( सर्व काँग्रेसचे), शिवाजी गावंडे, मो. अबू मो. गयास बागवान, उदयराज पवार, कृष्णा उकिर्डे (सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे), मुरलीधर चौधरी, प्रकाश जाधव, गणेश नवले, अशोक शिंदे (सर्व शिवसेनेचे).

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाmarket yardमार्केट यार्ड