शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नामांतर केलेल्या दोन्ही शहरावरून महायुतीचा पेच कायम; शिंदे गट ठाम, भाजपही मागे हटेना

By बापू सोळुंके | Updated: March 29, 2024 18:21 IST

शिंदे गट शिवसेनेच्या यादीतही छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या जागेचा सस्पेन्स कायम

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने गुरुवारी लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मात्र या यादीत मराठवाड्यातील केवळ हिंगोली मतदारसंघातून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने औरंगाबाद आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचा सस्पेन्स कायम राहिला आहे. 

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघावर शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांकडून दावा सांगितला जात आहे. यामुळे महायुतीच्या जागावाटपात ही जागा शिंदे गट शिवसेनेला मिळेल, असे सांगण्यात येत आहे. मात्र भाजपनेदेखील अद्याप मैदान सोडले नसल्याचे शिंदे गटाच्या आजच्या यादीतून दिसून येते. त्यांनी उस्मानाबाद आणि औरंगाबादचे उमेदवार जाहीर केलेले नाही.

शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना एक-दोन दिवसांत शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर होईल आणि त्यात औरंगाबादच्या उमेदवाराचा समावेश असेल, असे सांगितले होते. मात्र तसे झाले नाही. शिंदे गटाचे तीन आमदार मतदारसंघात असतानाही पहिल्या यादीत औरंगाबादचा समावेश न करण्यामागे महत्त्वाचे कारण असू शकते, अशी चर्चा आहे. या जागेसाठी भाजपनेही जोर लावला असून, शेवटच्या क्षणी हा मतदारसंघ आम्हाला सुटेल, असा दावा पक्षातील नेते करत आहेत.

नामांतर केलेलेच अडले !महायुती सरकारने अलीकडेच उस्मानाबादचे धाराशिव आणि औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर केले. मात्र, या दोन ठिकाणीच महायुतीचे घोडे अडले आहे. शिवाय, या दोन्ही शहरांचे नामांतर झाले असले तरी मतदारसंघाचे नाव मात्र पूर्वीचेच राहाणार आहे.

...तरच भाजपला संधी !उस्मानाबादबाबत काय निर्णय होतो, यावरही बरेच अवलंबून आहे. उस्मानाबादची जागा शिंदे गटाकडे अथवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली तरच औरंगाबादची जागा भाजपच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४