शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर साखर कारखान्याच्या सभेत गोंधळ; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वातावरण निवळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 15:44 IST

विद्यमान संचालक मंडळावर झालेल्या गैरव्यवहाराच्या आरोपांना सत्ताधारी कशाप्रकारे उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गंगापूर : गंगापूर सहकारी साखर कारखानाची ४३ वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष आमदार प्रशांत बंब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. परंतु, दुपारी अडीच वाजेपर्यंत कोरम पूर्ण न झाल्याने चार वाजेपर्यंत तहकूब करण्याचे अध्यक्ष बंब यांनी जाहीर करताच विरोधक सभासदांनी गोंधळ घालायला सुरवात केल्याने काही काळ तणावाचे वातावरण झाले होते यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. 

१५ कोटी ७५ लाख अपहाराच्या आरोपामुळे संपूर्ण राज्यात गाजलेल्या व राज्य सहकारी बँकेने चौथ्यांदा निविदा काढलेल्या गंगापुर कारखान्याची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. कारखान्याच्या विद्यमान सत्ताधाऱ्यांवर नोव्हेंबर २०२० मध्ये अपहाराचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर कोविडमुळे होणारी वार्षिक सभा ऑनलाईन पार पडली होती यावर्षी तालुक्यामध्ये अतिरिक्त झालेल्या अतिरिक्त उसाच्या उत्पादनामुळे कारखाना चालू व्हावा अशा शेतकऱ्यांचा भावना असून कारखाना २५ वर्षाकरिता भाड्याने दिला असल्याची चर्चा असतानाच वार्षिक सभा आयोजित केली आहे. 

यामध्ये सर्व खुलासे होणार असून विद्यमान संचालक मंडळावर झालेल्या गैरव्यवहाराच्या आरोपांना सत्ताधारी कशाप्रकारे उत्तर देणार याकडे देखील तालुक्याचे लक्ष लागले होते त्यामुळे सभा वादळी ठरणार असल्याचा अंदाज आल्याने पोलिसांनी सभास्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता सभेत फक्त सभासदांनाच प्रवेश देण्यात आला होता. दरम्यान, कारखान्याचे अध्यक्ष आमदार बंब यांनी कोरम पूर्ण न झाल्याने सभा चार वाजेपर्यंत तहकूब  केली. यामुळे विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPrashant Bambप्रशांत बंबSugar factoryसाखर कारखाने