शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांसमोरच शिक्षकाची मुख्याध्यापकास शिवीगाळ; माफीनाम्यानंतर प्रकरण मिटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 17:09 IST

संस्थाचालकाच्या उपस्थितीत शिक्षकाने  माफीनामा दिल्यामुळे प्रकरण पोलिसांत न जाता शाळेतच मिटविण्यात आले.

औरंगाबाद : शाळेसमोरील रस्त्यावर मोटारसायकल लावू नका, असे सांगितले म्हणून मुख्याध्यापकास शाळेतील शिक्षकाने शिवीगाळ केल्याचा प्रकार मुकुंदवाडी, प्रकाशनगरातील ज्ञानदीप विद्यामंदिर शाळेत घडला. संस्थाचालकाच्या उपस्थितीत शिक्षकाने  माफीनामा दिल्यामुळे प्रकरण पोलिसांत न जाता शाळेतच मिटविण्यात आले.

ज्ञानदीप विद्यामंदिर शाळेत बुधवारी गोवर-रुबेला लस आणि महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. परिसरातील पालकांनाही आमंत्रित केले होते.  शाळेतील सहशिक्षक पंढरीनाथ खंदारे यांनी शाळेच्या दरवाजाच्या बाजूलाच मोटारसायकल उभी केल्यामुळे त्यांना ती काढून समोरच्या मैदानात लावण्याची सूचना माध्यमिकचे प्राध्यापक रमेश आकडे यांनी केली.  याचा राग आल्यामुळे खंदारे यांनी आकडे यांना शाळेच्या प्रवेशाद्वारातच शिवीगाळ केली. यावेळी विद्यार्थी व पालकही उपस्थित होते.

हा प्रकार सकाळी ७.१५ वाजता घडल्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या बघ्यांची गर्दी जमली होती.  शाळेतील इतर शिक्षकांनी मध्यस्थी करून दोघांनाही बाजूला नेले. यामुळे हाणामारीचा प्रसंग टळला. मात्र, या शिवीगाळीचा प्रकार शाळेतील  सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सीसीटीव्ही दाखवून घडलेली सर्व हकीकत मुख्याध्यापकांनी ‘लोकमत’शी बोलताना विशद केली.  संस्थाचालक सुनील पालवे यांनीही शाळेत धाव घेत सीसीटीव्ही पाहिल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची सूचना  केली. यानुसार पोलीस ठाण्यात जाण्यापूर्वीच संबंधित शिक्षकाने अनवधानाने हा प्रकार घडला असून, त्याबद्दल लेखी दिलगिरी व्यक्त केली. 

हा चुकीचा प्रकार शाळेत घडलेला प्रकार चुकीचा आहे. मागील दोन वर्षांत शाळेचा कायापालट करण्यात आला आहे. मात्र, शाळेतील दोन शिक्षक या विकासात्मक कामात, अशा पद्धतीने वागून अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी यापुढे काही गैरप्रकार केल्यास त्यांना योग्य पद्धतीने धडा शिकविण्यात येईल.- सुनील पालवे, संस्थाचालक

टॅग्स :SchoolशाळाTeacherशिक्षकStudentविद्यार्थी