शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना चिंता; मृग नक्षत्राच्या मुहुर्ताला पावसाची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 12:53 IST

मृग नक्षत्र लागले; परंतु अपवाद वगळता कुठेही दमदार पाऊस झाला नाही.

ठळक मुद्देशेवटच्या चरणात बरसल्या होत्या रोहिण्यापावसाने दिली हुलकावणी

औरंगाबाद : रोहिणी नक्षत्राच्या शेवटच्या चरणामध्ये मराठवाड्यातील काही भागांत बऱ्यापैकी पाऊस झाला. तयार झालेले पावसाळी वातावरण पुढे टिकले नाही. रविवारी रात्री मृग नक्षत्र लागले; परंतु सोमवारी सायंकाळपर्यंत अपवाद वगळता कुठेही दमदार पाऊस झाला नाही. मृग नक्षत्राच्या मुहूर्ताला पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांत चिंता निर्माण झाली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातही पावसाने दांडी मारली. जिल्ह्यात रविवारपासून कोरडे वातावरण आहे. सोमवारीही पावसाची नोंद नाही. तापमानात वाढ झाली आहे. 

पावसाची हुलकावणीपरभणी :  पालम तालुक्यात रविवारी रात्री झालेला हलका पाऊस वगळता जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी पावसाने हुलकावणी दिली आहे. रविवारी रात्री पालम तालुक्यात केवळ ०.६७ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. 

जालन्यात पावसाची प्रतीक्षाजालना : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जिल्ह्यात रविवारी रात्री भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव-शेरमूल परिसरात हलका पाऊस झाला. उर्वरित  जिल्ह्यात अन्यत्र कुठेच सोमवारी सायंकाळपर्यंत पाऊस झाला नाही. 

नांदेडमध्ये पाऊस नाहीनांदेड : जिल्ह्यात १ व २ जून रोजी रोहिण्याचा दमदार पाऊस झाल्यानंतर मृग नक्षत्राचा पहिला दिवस कोरडा गेला. 

कुठे कुठे मृगाच्या किरकोळ सरीबीड : बीड जिल्ह्यात रविवारी बीड, गेवराई आणि माजलगाव तालुका  वगळता अन्य तालुक्यात मृगाचा पाऊस बरसलाच नाही. रविवारी बीडमध्ये दुपारी दहा मिनिटे तर गेवराई व माजलगाव तालुक्यात काही ठिकाणी मृगाच्या सरी कोसळल्या. परळी, धारूर, केज, अंबाजोगाई, शिरूर, पाटोदा, आष्टी आणि शिरुर तालुक्यात निरंक नोंद झाली. सोमवारी मात्र जिल्हाभरात कोठेही पाऊस झाला नव्हता. जूनच्या पहिल्या तीन दिवसांत पूर्वमोसमी पावसामुळे मृग नक्षत्रात पेरण्यांसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू होती. मात्र नक्षत्रातील पहिले दोन दिवस असेच गेले. 

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाagricultureशेतीFarmerशेतकरी