शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

बायपासचे काम पूर्ण, मेहनत केल्याचे समाधान - क्षीरसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:19 IST

बीड शहरापासून जाणारा हा १२ किलोमिटरचा बायपास आज पूर्ण झाला असून रस्ता सुरक्षा प्रमाणपत्र मिळताच तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येडशी ते औरंगाबाद हा चार पदरी रस्ता करण्याचा प्रस्ताव तत्कालीन सरकारच्या काळात सादर करण्यात आला होता. त्यानंतर लगेच डीपीआर तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले. १९० किलोमिटर लांबीचा आणि १८०० कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आपल्या कार्यकाळात मार्गी लावत असताना अनेक अडचणी पार करून हे काम पूर्णत्वास जात आहे. बीड शहरापासून जाणारा हा १२ किलोमिटरचा बायपास आज पूर्ण झाला असून रस्ता सुरक्षा प्रमाणपत्र मिळताच तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या कामासाठी केलेले प्रयत्न आणि मेहनत याबाबत आज आपण समाधानी असल्याचे आ. जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले.शुक्र वारी आ. जयदत्त क्षीरसागर यांनी कामाची पाहणी केली. यावेळी आय.आर.बी.चे प्रकल्प संचालक चौरे आणि नॅशनल हायवेचे घोटकर , तसेच दिनकर कदम, विलास बडगे, अरूण डाके, डॉ. योगेश क्षीरसागर, अ‍ॅड.शेख शिफक, अ‍ॅड.सय्यद खाजा, विलास विधाते, वैजनाथ तांदळे, राजेंद्र पवार, अशोक हिंगे, अरूण डाके, बबन गोरे, विलास बोबडे, अरूण बोंगाणी, धनंजय वाघमारे, दत्ता गायकवाड, अ‍ॅड.महेश धांडे आदि उपस्थित होते.पाहणीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना आ. क्षीरसागर यांनी या बायपासच्या कामाच्या बाबतीत संपूर्ण माहिती पत्रकारांना दिली. शहरापासून जाणाºया राष्ट्रीय महामार्ग २११ वर सातत्याने अपघात होऊन अनेक नागरिकांचे प्राण गेले. यासाठी शहराच्या बाहेरून बायपास रस्ता करणे आवश्यक झाले त्यामुळे याबाबतीत आपण प्रयत्न करण्यास सुरवात केली. बायपास करत असताना शहराच्या पुर्वेला करावा की पश्चिमेला याबाबत वेगवेगळी मत मतांतरे आली. हा निर्णय घेण्यासाठी बीड येथील स्व.यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात तत्कालीन प्रकल्प संचालक चामल गोरे यांनी जनसुनावणी घेऊन हा बायपास पूर्व बाजूने करण्याचा निर्णय झाला. या रस्त्याचा प्रस्ताव परिपूर्ण करून केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला तेंव्हा केंद्रीय पर्यावरण विभागाचे प्रमाणपत्र आवश्यक होते. यासाठी तत्कालीन केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांच्याशी भेटून या प्रकल्पाला सहकार्य करण्याची विनंती केली. त्यानंतर नाहरकरत प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले. येडशी ते औरंगाबाद हा रस्ता चौपदरी करण्यात यावा अशी मागणी त्याच वेळी आपण तत्कालीन केंद्रीय रस्ते विकास मंत्री कमलनाथ व सि.पी. जोशी यांची अनेक वेळा भेट घेऊन या प्रकल्पास मंजूरी मिळवून घेतली. बीड शहरातून वाढत्या रहदारीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले होते त्यामुळे भूसंपादनाचे काम तात्काळ करून घेण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी नविलकशोर राम यांच्या माध्यमातून हे काम पूर्णत्वास आले. आज बीड बायपासचे काम पूर्ण होऊन तो जनतेसाठी वाहतुकीला खुला होत आहे यात आपण केलेल्या प्रयत्नाला आणि मेहनतीला यश आल्याचा आनंद माझ्यासह संपूर्ण बीडकरांना झाला आहे, असेही आ. क्षीरसागर यांनी सांगितले.