शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
2
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
3
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
4
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
5
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
6
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
7
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
8
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
9
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
10
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
11
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
12
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
13
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
14
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
15
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
16
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
17
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
18
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
19
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
20
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कमी दरानेच नुकसानभरपाई; रद्द केलेला GR पुन्हा लागू होणार का?

By विकास राऊत | Updated: September 9, 2025 15:05 IST

माझ्या काळात ४५ कोटींची नुकसानभरपाई दिली होती: उपमुख्यमंत्री शिंदे

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मी मुख्यमंत्री असताना ४५ हजार कोटींची भरपाई दिली होती, असे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२४ चा जीआर रद्द केला, तो पुन्हा लागू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलणार काय, या प्रश्नाचे उत्तर देणे खुबीने टाळले. यामुळे यंदा शेतकऱ्यांना जुन्या अर्थात कमी दराने नुकसानभरपाई मिळणार हे स्पष्ट झाले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी छत्रपती संभाजीनगरात आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांना जानेवारी २०२४ चा नुकसानभरपाईचा जीआर गैरलागू केल्याप्रकरणी ‘लोकमत’ प्रतिनिधीने विचारले असता, सरकार शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, असे मोघम उत्तर त्यांनी दिले.

मराठवाड्याची सद्य:स्थिती

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात सुमारे १५ लाख ७८ हजार ३३ शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या हातून गेल्या आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मदतीचे निकष बदलून दुप्पट दराने नुकसानभरपाईचा निर्णय झाला होता. तो निर्णय जून २०२५ मध्ये विद्यमान सरकारने बदलला. मार्च २०२३ च्या निर्णयाप्रमाणे नुकसानभरपाईचे दर लागू केल्यामुळे यावर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अत्यल्प नुकसानभरपाई मिळणार आहे. पेरणीसह बियाणे, खतांच्या किमतीमध्ये वाढ झालेली असताना जुन्या दरामुळे मिळणारी भरपाई तुटपुंजी असेल.

किती असेल फरक?२०२३ च्या निर्णयाप्रमाणे नुकसानभरपाई दिल्यास ती साधारणत: ११०० कोटी रुपयांची मिळेल. तर २०२४ च्या जीआरप्रमाणे भरपाई मिळाली तर ती १७०० कोटींपर्यंत आकडा जातो. सुमारे ६०० कोटींचा फरक या दोन जीआरमध्ये आहे.

मराठवाड्यात यंदा झालेले पिकांचे नुकसान असे......जिरायत....१२ लाख ३६ हजार ३०१ हेक्टर.......बागायत...३ हजार ८९ हेक्टरफळपीक...६ हजार ८७८ हेक्टरएकूण.....१२ लाख ४६ हजार २४९ हेक्टर

नुकसानीचा प्रकार ...........१ जाने. २०२४ चा निर्णय...................यंदाची नुकसानभरपाई या दरानेजिरायत......................१३६०० रु. प्रति हेक्टर, ३ हेक्टरपर्यंत............८५०० रु. प्रति हेक्टर २ हेक्टर मर्यादेत.बागायत......................२७ हजार रु. प्रति हेक्टर, ३ हेक्टर मर्यादेत.........१७ हजार रु. प्रति हेक्टर २ हेक्टर मर्यादेत.बहुवार्षिक पिके................३६ हजार रु.प्रति हेक्टर ३ हेक्टर मर्यादेत.....२२५०० रु. प्रति हेक्टर २ हेक्टर मर्यादेत.

किती गावांतील किती शेतकऱ्यांचे नुकसान..?जिल्हा.......................गावे................शेतकरी............किती पंचनामेछत्रपती संभाजीनगर.......५५................४०६६..................६१ टक्केजालना.....................१८४................२७६५९...............०० टक्केपरभणी....................३१९................१४३१३५.................८२ टक्केहिंगोली......................७०३.............१७२५७७.................७८ टक्केनांदेड.........................१३२६.........६५५४१५...................७० टक्केबीड..........................२०६...............४२८९५.................७० टक्केलातूर......................७८२................३६४५५१................०.५९ टक्केधाराशिव...................३६४.................१६७७३५...............४३ टक्केएकूण......................३९२९...............१५७८०३३...............४५ टक्के

टॅग्स :Rainपाऊसchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर